पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर


पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार ९२२ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ १ हजार ३२९ हरकती पूर्णतः तर ६९ हरकती अंशत: मान्य करण्यात आल्या आहेत. तब्बल ४ हजार ५२४ हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत. ४१ पैकी २८ प्रभागांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ८ प्रभागांची नावे बदलली असून, केवळ ५ प्रभागांमध्ये काही क्षुल्लक बदल करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग ४ दस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग ५ सदस्यीय आहे. या हरकती सूचनांवर सुनावणी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्यापुढे झाली. नॅशनल हायवे, शहरातील मोठे प्रभागाची व्याप्ती वाढली आहे. प्रभाग रचना करताना भौगोलिकदृष्ट्या काही तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या वस्त्यांचे विभाजन करू नये असे राज्य सरकारचे निकष असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात वस्त्याच्या वस्त्या वगळून टाकल्या आहेत.


प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रूक- केशवनगर- साडे सतरा नळीमधील थिटे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक ४ खराडी - वाघोलीला जोडला आहे. त्यामुळे या प्रभागात ६ हजार ५०० लोकसंख्या वाढली आहे. अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक १८ वानवडी - साळुंके विहार या प्रभागाचा शिंदे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क - घोरपडी- मुंढवा या प्रभागाला जोडण्यात आला आहे. प्रारूप रचनेमध्ये शिंदे वस्तीचे रस्त्याने विभाजन झाले होते. प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवा चा मगरपट्टा सिटी रस्त्याच्या समोरील भाग हा प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी- माळवाडी- वैदुवाडीला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक २० बिबवेवाडी - महेश सोसायटी या प्रभागाचे नावही बदलले असून, बिबवेवाडी- शंकर महाराज मठ असे करण्यात आले आहे. या प्रभागातील के. के. मार्केट येथील पुण्याई नगर हा भाग प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर - आंबेगाव - कात्रज या प्रभागाला जोडण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे - वडगाव बुद्रूक - आंबेगावचा दाभाडी हा भाग पाच सदस्य प्रभाग ३८ बालाजीनगर - आंबेगाव- कात्रज या प्रभागाला जोडण्यात आला आहे. तसेच कोळेवाडी, जांभूळवाडी हा भागदेखील प्रभाग क्रमा


नावे बदललेले प्रभाग पुढीलप्रमाणे:


प्रभाग क्रमांक १ - कळस - धानोरी- लोहगाव उर्वरित (कळस - धानोरी)


प्रभाग क्रमांक १४ - कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवा (कोरेगाव पार्क - मुंढवा)


प्रभाग क्रमांक १५ - मांजरी बुद्रुक- केशवनगर- साडेसतरा नळी ( मांजरी बुद्रुक - साडेसतरा नळी)


प्रभाग क्रमांक १७ - रामटेकडी - माळवाडी- वैदूवाडी (रामटेकडी - माळवाडी)


प्रभाग क्रमांक २० - शंकर महाराज मठ - बिबवेवाडी (बिबवेवाडी - महेश सोसायटी)


प्रभाग क्रमांक २४ - कसबा गणपती - कमला नेहरू हॉस्पिटल - के. ई. एम. हॉस्पिटल (कमला नेहरू हॉस्पिटल - रास्ता पेठ)


प्रभाग क्रमांक २६ - घोरपडे पेठ - गुरुवार पेठ - समताभूमी (गुरुवार पेठ - घोरपडे पेठ)


प्रभाग क्रमांक ३८ - बालाजीनगर - आंबेगाव - कात्रज (आंबेगाव - कात्रज).


Comments
Add Comment

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय