इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार



गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा केली होती. हमासनेही यावर सकारात्मक पाऊल उचलले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी इस्त्रायलला त्वरित बॉम्ब हल्ले थांबवण्यास सांगितले होते. मात्र इस्त्रायलने शनिवारी गाझावर पुन्हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायलच्या या हल्ल्यामुळे आता मिडल ईस्टमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन फिसकटण्याची शक्यता आहे.

इस्त्रायलने गाझा पट्टीत वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले. त्यात एका ठिकाणी ८ लोकांचा तर गाझा सिटीमध्ये केलेल्या हल्ल्यात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, इस्त्रायलने डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता प्लॅनच्या पहिल्या टप्प्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती माध्यमांना दिल्यानंतर देशाच्या राजकीय नेतृत्वाने गाझामधील लष्करी मोहिमेची तीव्रता कमी करण्याच्या सूचना केल्या होत्या. इस्त्रायली लष्कर प्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅनची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज राहा, असे सांगितले होते. मात्र त्यांनी गाझामधील लष्करी कारवाईची तीव्रता कमी करायची आहे की नाही याबाबत कोणताही स्पष्ट संदेश दिला नव्हता.

दरम्यान, पॅलस्टाईनमधील गाझावर हमासचे नियंत्रण आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या २० पॉईंट प्लॅनला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलने त्वरित गाझामधील बॉम्ब हल्ले थांबवण्याची सूचना केली होती. त्यांच्या मते यामुळे हमासला बंधकांना त्वरित सोडणे शक्य होईल. यावेळी त्यांनी हा प्लॅन फक्त गाझासाठी महत्वाचा नाही तर संपूर्ण मध्य पूर्व आशियातील शांततेसाठी महत्वाचा असल्याचे सांगितले होते.

Comments
Add Comment

अमेरिका करणार अणवस्त्रांची चाचणी, रशियाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा मोठा निर्णय!

अमेरिका: रशियाने नुकतेच 'पोसायडन' नावाच्या आण्विक-शक्तीवर चालणाऱ्या अंडरवॉटर ड्रोनची चाचणी यशस्वी केल्याचे

नॅशनल गार्डचे जवान २०२६ पर्यंत 'नागरी अशांती'साठी प्रशिक्षित केले जातील, अमेरिकन संरक्षण खात्याची माहिती

वॉशिंग्टन: अमेरिकेत आता नागरी अशांती आणि मोठ्या दंगली नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठी तयारी

युद्ध पुन्हा पेटले! इस्रायलच्या हवाई हल्ल्यात १०४ पॅलेस्टिनी नागरिक ठार

ट्रम्प यांच्या मध्यस्थी नंतरही शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन Gaza war : गाझा पट्टीमध्ये रात्री झालेल्या हवाई

अमेरिका-चीन भेटीआधीच ड्रॅगनची डरकाळी! गरज पडल्यास बळाचा वापर करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, चीनची अमेरिकेला स्पष्ट धमकी

ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग झाले आक्रमक बीजिंग: अमेरिकेचे

कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या उद्योगपतीची हत्या! बिश्नोई टोळीतील सदस्याने दिली हत्येची कबूली

कॅनडा: कॅनडात भारतीय वंशाचे उद्योगपती दर्शन सिंग साहसी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कॅनडातील

Police Encounter : इतिहासातील सर्वात मोठ्या एन्काऊंटरचा थरार! एका रात्रीत ६४ गुंडांचा खात्मा, कारवाईने देश हादरला

साओ पावलो, ब्राझील : एक काळ असा होता जेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डची मोठी दहशत होती. ही दहशत मोडून काढण्यासाठी प्रदीप