सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात


कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने दमदार सुरुवात केली आहे. भारताने बारा षटकांत एक बाद ५५ धावा केल्या आहेत. स्मृती मंधाना २३ धावा करुन बाद झाली. फातिमा सनाने स्मृतीला पायचीत केले. आता प्रतिका रावल आणि हरलीन देओल या दोघी खेळत आहेत.


पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास भारत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहोचणार आहे. विश्वचषकात भारताचा पहिला साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध झाला. हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने ५९ धावांनी जिंकला. पाकिस्तान विरुद्धचा सामना हा भारताचा दुसरा साखळी सामना आहे. हा सामना जिंकल्यास चार गुणांसह भारत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहोचणार आहे. सध्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ तीन गुणांसह पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला आणि श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे तीन गुणांसह ऑस्ट्रेलिया गुणतक्त्यात पहिल्या स्थानी पोहोचली.


भारतीय महिला क्रिकेट संघ : प्रतिका रावल , स्मृती मानधना , हरलीन देओल , हरमनप्रीत कौर (कर्णधार) , जेमिमाह रॉड्रिग्स , रिचा घोष (यष्टीरक्षक) , दीप्ती शर्मा , स्नेह राणा , रेणुका सिंग ठाकूर , क्रांती गौड , श्री चरणी


पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघ : मुनीबा अली , सदाफ शमास , सिद्रा अमीन , रमीन शमीम , आलिया रियाझ , सिद्रा नवाज (यष्टीरक्षक) , फातिमा सना (कर्णधार) , नतालिया परवेझ , डायना बेग , नशरा संधू , सादिया इक्बाल


Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या