सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती


युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील असंख्य पात्र उमेदवारांना नोकऱ्या देऊन सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीच्या बाबतीत देशात अग्रस्थानी आहे. यामुळे राज्यातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या रोजगार वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहणे हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना
व्यक्त केल्या.

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :सामान्य जनतेसाठी दूरदृष्टी असणारे लोकनेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अनुकंपा भरती व लोकसेवा आयोगामार्फत १० हजार ३०९ कर्मचारी भरती राज्यात शनिवारी एकाच वेळी झाली. ‘शब्दापलीकडे कृती’ अशी प्रचिती या महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेला दिली. सिंधुदुर्गात अनुकंपाची २५ व लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदावर ८१ पदावरती पात्र उमेदवारांना महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी म्हणून नियुक्तीपत्रे देण्यात आली. हा कार्यक्रम फक्त रोजगाराचा नव्हे, तर राज्य सरकारचे जनतेवरील प्रेम व जबाबदारीचे प्रतीक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता हा ऐतिहासिक कार्यक्रम कायम लक्षात ठेवेल! असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

दृकश्राव्य प्रणालीद्वारे मुबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा मुख्य कार्यक्रम व सिंधुदुर्गसह प्रत्येक जिल्ह्यात शनिवारी झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे, मंत्री आशीष शेलार, मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते.
Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.