तर त्या पुरस्काराला काही अर्थ नाही: राणी मुखर्जी

एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीने तिच्या राष्ट्रीय पुरस्कारानंतरच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “३० वर्षांनंतर मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय खास आहे. राणी पुढे म्हणाली, “या वर्षी शाहरुख खानलाही त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आम्हा दोघांसाठीही हा अनुभव खूप समाधानकारक होता. कारण-जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो आणि लोक म्हणतात की, ‘तिला तो मिळायला नको होता’, तेव्हा त्या पुरस्काराला काही अर्थ उरत नाही.


पण जेव्हा लोक असं म्हणतात की, ‘या पुरस्कारासाठी तीच पात्र होती’, तेव्हा आम्हा कलाकारांना खरा आनंद होतो आणि समाधान मिळतं.” या संवादात राणीनं कलाकारांसाठी पुरस्काराचं महत्त्व काय असतं? यावरही प्रतिक्रिया दिली.


याबद्दल ती म्हणाली, “प्रत्येक कलाकारासाठी पुरस्काराचं महत्त्व हे असतंच. मी प्रेक्षकांसाठी काम करते. माझं काम त्यांना आवडावं म्हणून मी इतकी मेहनत करते. जेव्हा मला एखादा पुरस्कार मिळतो, तेव्हा ते आनंदित होतात आणि त्यांना माझे चाहते किंवा प्रेक्षक असल्याचा अभिमान वाटतो.


त्यामुळे हो… पुरस्कार मिळणं हे कलाकारासाठी खूप खास असतं.” राणी मुखर्जीनं याआधी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’साठीचे काही पुरस्कार जिंकले आहेत; मात्र राष्ट्रीय पुरस्कार तिला पहिल्यांदाच मिळाला. असंच काहीसं शाहरुख खानच्याही बाबतीत घडलं. त्यालाही ‘जवान’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.