गोवंडीतील शताब्दी रुग्णालयातही मिळणार महापलिकेच्या शीव रुग्णालयाप्रमाणे आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय बनणार

मुंबई(सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालये खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा निर्णय घेत काही रुग्णालयांच्या खासगीकरणासाठी निविदा मागवल्यानंतर एकमेव गोवंडीतील पंडित महनमोहन मालवीय अर्थात गोवंडी शताब्दी रुग्णालयाच्या खासगीकरणासाठी प्रतिसाद लाभला आहे. या रुग्णालयाच्या खासगीकरणासाठी मागवलेल्या स्वारस्य अभिरुची अर्जाला प्रतिसाद लाभला असून यासाठी तीन संस्थांचे अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे यातील एका पात्र संस्थेची निवड केली जाणार आहे. त्यामुळे या नियुक्त संस्थेच्या माध्यमातून गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु होवून महापालिकेच्या शीव रुग्णालयाप्रमाणे याठिकाणी रुग्णांना उपचार मिळणार आहे.


मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी आरोग्य सेवांकरता सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात पीपीपी धोरण राबवणार असल्याची घोषणा केली. नागरिकांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात या करता महापालिका पीपीपी धोरण राबवण्याचा निर्णय घेत महापालिका आरोग्य विभागाने विकास नियोजन आराखडा २०३४ अंतर्गत आरक्षित जमिनी, रुग्णालये, प्रसुतीगृहे, दवाखाने इत्यादीचा या धोरणाचा समावेश केला.


त्यानुसार, आर उत्तर विभागातील ४९० खाटांचे भगवती रुग्णालय, बोरीवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नॉस्टिक सेंटर, दादरमधील जाखादेवी आरोग्य सुविधा केंद्र, विक्रोळी पार्क साईट वरील ३० खाटांचे रुग्णालय आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिकेला हस्तांतरीत झालेले एम पूर्व विभागातील ३०० खाटांचे रुग्णालय, गावंडीतील पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालय आदी वास्तू ३० वर्षांच्या करारावर आरोग्य सेवांकरता खासगी संस्थांना देण्यासाठी खासगी संस्थांकडून स्वारस्य अर्ज मागवण्याचा निर्णय घेतला होता.


मात्र, भगवती रुग्णालयाला विरोध झाल्यानंतर भगवती रुग्णालय खासगी संस्थेच्या माध्यमातून न भरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दादर जाखादेवी आरोग्य सुविधा केंद्र आणि विक्रोळी पार्क साईट रुग्णालय आदी खासगी संस्थेला न देण्याचा निर्णय घेत गोवंडी शताब्दी रुग्णालय आणि मानखुर्द एमएमआरडीएने हस्तांतरीत केलेल्या रुग्णालयांसाठीच स्वारस्य अभिरुची अर्ज मागवले होते. यातील केवळ गोवंडी शताब्दी रुग्णालयासाठी तीन स्वारस्य अभिरुची अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती मिळत आहे. तीन प्राप्त अर्जदारांशी वाटाघाटी करून महापालिकेच्या अटी व शर्तीनुसार रुग्णालय पात्र संस्थेला चालवण्यास दिले जाणार असून त्यानुसार याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार आहे. गोवंडी शताब्दी रुग्णालय खासगी संस्थेला चालवण्यास दिल्यास याठिकाणी सुरु होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून शीव रुग्णालयाप्रमाणेच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्यावतीने खासगी संस्थांना रुग्णालये चालवण्यास दिल्याने रुग्णांना करावा लागणारा खर्च आणि महापालिकेचा होणारा आवर्ती खर्च कमी होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून

पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.

IMD: महाराष्ट्रासाठी 'चक्रीवादळ शक्ती'चा इशारा; ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

पुणे/मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) अरबी समुद्रात विकसित होत असलेल्या 'चक्रीवादळ शक्ती' च्या पार्श्वभूमीवर

दिवाळीसाठी गावाला जाताय, रेल्वे सोडतेय ३० विशेष गाड्या

दिवाळीनिमित्त अतिरिक्त विशेष गाड्या धावणार मुंबई (प्रतिनिधी) : येत्या दिवाळी उत्सवानिमित्त प्रवाशांच्या