लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ


पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी उमेदवारीवरून जोरदार गोंधळ झाला. लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या निवासस्थानी आरजेडीचे आमदार सतीश कुमार यांच्या उमेदवारीला विरोध करत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी करत गोंधळ घातला. यावेळी आम्हाला चोरटा आमदार नको, सतीश कुमार यांना हरवायचे आहे, अशी घोषणाबाजी केली.


बिहारमधील मखदुमपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सतीश कुमार यांच्या उमेदवारीला विरोध करत अनेक कार्यकर्ते मखदुमपूर विधानसभा मतदारसंधातून पाटणा येथे आले होते. कार्यकर्ते अचानक लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी घुसले. विद्यमान आमदार सतीश कुमार यांनी कुठलेही काम केलेले नाही. जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली.


लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्व केला. मात्र बराच वेळ हा गोंधळ सुरू होती. या घटनेमुळे निवडणुकीच्या तोंडावर आरजेडीच्या नेतृत्वाची अडचण वाढली आहे. तसेच तिकीट वाटपावरून अंतर्गत विरोधही वाढला आहे. मखदुमपूर येथून उमेदवारी कुणाला द्यायची हा प्रश्न उभा राहिला आहे


Comments
Add Comment

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील

छत्तीसगडमधील बेकायदेशीर सामूहिक धर्मांतरास जन्मठेपेची शिक्षा

धर्मांतरविरोधी विधेयक मंजूर बळजबरी आणि प्रलोभनाद्वारे धर्मांतरासाठी कठोर दंडात्मक तरतुदी रायपूर : छत्तीसगड

केंद्र सरकारचा बेटिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सवर स्ट्राईक

नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेकायदेशीर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर