मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि उपचार, लसीकरण मोहीम, रेबीज प्रतिसाद पथक (RRT), श्वान नियंत्रण युनिट (DCOs), प्री-एक्स्पोजर प्रोफिलॅक्सिस (PrEP) आदींची सद्यस्थिती आणि त्या अनुषंगाने आवश्यक तयारी याबाबत विचारमंथन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या रेबीजविषयक कार्यसमितीची (Task Force) बैठक शुक्रवारी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली. तसेच, रेबीज निर्मूलनासंबंधी प्रयत्नाचे बळकटीकरण’ या विषयावर कार्यशाळाही संपन्न झाली. मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने देवनार पशुवधगृह येथे या बैठक आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

प्राणी कल्याण करणे व प्राण्यांपासून होणारे संक्रमण टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचा एक भाग म्हणून या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण, हाफकिन संस्थेच्या सहायक संचालक डॉ. उषा पद्मनाभन, वरिष्ठ पशु वैद्यकीय अधिकारी व रेबीज समन्वय अधिकारी डॉ. स्नेहा ताटेलू, वेव होपचे वैद्यकीय संचालक (विशेष उपक्रम) डॉ. शशिकांत जाधव, पेटा संस्थेचे भारतातील कायदेशीर सल्लागार व संचालक मीत अशर, सिटिझन के-९ इंडियाचे श्वान प्रशिक्षक राज मरीवाला, महानगरपालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी मंगेश कुंभारे, सहायक वैद्यकीय अधिकारी सुरेश उचले, गोवा मिशन रेबीजच्या मेलिशा फिग्रेदो, वैद्यकीय अधिकारी डॉ. जुनेद शेख आदी या बैठकीस उपस्थित होते.

'मुंबई रेबीज निर्मूलन मोहीम' हा मुंबई महानगरपालिका व मिशन रेबीज यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. वर्ष २०३० पर्यंत मुंबईला रेबीजमुक्त करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा संकल्प आहे. या निमित्ताने जनजागृती अभियान, आरोग्य शिक्षण सत्रे आणि लसीकरण मोहिमा राबविण्यात येत आहेत.

याच धर्तीवर आयोजित बैठक आणि कार्यशाळेत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि उपचार, लसीकरण मोहीम, रेबीज प्रतिसाद पथक (RRT), श्वान नियंत्रण युनिट (DCOs), प्री-एक्स्पोजर प्रोफिलॅक्सिस आदींची सद्यस्थिती आणि त्या अनुषंगाने आवश्यक तयारी यासोबतच मुंबई रेबीज निर्मूलन मोहीमेसंबंधित कायदेशीर बाबी, प्राण्यांचे वर्तन, नागरिकांशी संवाद आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची