बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन



मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या सहकार्याने बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या आवारात ३ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दररोज सकाळी ९:३० ते रात्री ९:३० दरम्यान भव्य ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता आमदार मनिषाताई चौधरी ह्यांच्या शुभहस्ते पार पडले. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या ग्रंथप्रदर्शनासाठी उपायुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले आहे.



या ग्रंथ प्रदर्शनात विविध विषयांवरील मराठी भाषेतील हजारो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या प्रदर्शनात पुस्तकांच्या खरेदीवर वाचकांना १५ टक्क्यांची विशेष सवलत देण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर सुलेखनातून साकारलेले पसायदान असलेला आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. या सेल्फी पॉईंटसह छायाचित्र घेऊन ते आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करण्यासह महानगरपालिकेच्या एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम वा फेसबुक या सोशल मीडिया हँडलला 'टॅग' करणाऱ्या वाचकांना ५ टक्क्यांची अतिरिक्त सवलत बहाल करण्यात येणार आहे. यामुळे वाचकांना पुस्तकांच्या खरेदीवर तब्बल २० टक्क्यांची सवलत मिळू शकणार आहे.



या ग्रंथ प्रदर्शनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथ प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी अर्थात ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी भाग्यवान पुस्तक खरेदीदारांची निवड सोडतीच्या अर्थात 'लकी ड्रॉ' च्या आधारे करण्यात येणार आहे. यानुसार निवडण्यात येणाऱ्या पाच भाग्यवान वाचकांना दिवाळी अंकांचा संच ग्रंथाली ह्या संस्थेतर्फे मोफत भेट स्वरूप देण्यात येणार आहे.

२०० प्रकाशकांच्या आणि १०,००० लेखकांच्या जवळजवळ ५०,००० पुस्तकांची लक्षवेधी मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या वाचक स्नेही मांडणीमुळे वाचक अगदी आरामात उभे राहून वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके चाळून पाहू शकत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या पुढाकाराने आयोजित या प्रदर्शनातील पुस्तकांमध्ये नियमितपणे भर घालण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनात दर आठवड्याला नवनवीन पुस्तके वाचकांना उपलब्ध होऊ शकणार आहेत. ही पुस्तके, पाहून, चाळून विकत घेण्याचा आनंद वाचकांना मिळणार आहे. मान्यवर साहित्यिकांच्या सर्जनशील साहित्याबरोबर नित्योपयोगी अशा विविध विषयांवरची विविध पुस्तके या प्रदर्शनात खरेदी करता येतील. या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनात वाचकांच्या सेवेला असणारा कर्मचारी वर्ग हा जाणकार असल्याची काळजी घेण्यात आली आहे. यामुळे पुस्तक प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तक शोधणे सुलभ होणार आहे.

Comments
Add Comment

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट