मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडून फुलंब्री धरण परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

मच्छीमार बांधवांचा संवाद साधत उपाययोजना करण्याचे आश्वासन


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) :  मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमारांच्या नुकसानग्रस्त भागांची शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत मंत्री राणे यांनी मच्छीमार बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्यांचा आढावा घेतला आणि तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.


पाहणीदरम्यान, नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या समजून घेतल्या गेल्या आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक प्रशासनिक पावले, मदत आणि सहाय्य यावर चर्चा करण्यात आली. मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा तातडीने, अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्याच्या ठोस सूचना दिल्या, जेणेकरून नुकसानाचे अचूक दस्तऐवजीकरण होईल आणि त्यानंतर योग्य आर्थिक व प्रशासनिक मदत पोहोचवता येईल.


सदर पाहणीदरम्यान स्थानिक आमदार अनुराधा चव्हाण, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, तसेच इतर संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या अडचणींवर चर्चा केली आणि त्यांच्या तातडीच्या मदतीसाठी प्रशासनाची तत्परता  यावर  भर  दिला.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या