पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेची नवी इमारत विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असावी यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने पथदर्शी धोरण आखले आहे. या धोरणानुसार शाळांच्या नव्या इमारती गगनचुंबी असणार आहेत. या इमारतींमध्ये विज्ञान, भूगोल, संगणक आदींसाठी प्रयोगशाळा, वाचनालय, मानसिकदृष्ट्या विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी वर्ग, बहुउद्देशीय सभागृह, कौशल्य विकास केंद्र आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत.


मुंबई महापालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. पालिका नव्याने बांधत असलेल्या या इमारती सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहेत. या शाळांमध्ये प्रत्येक मजल्यावर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.


कुलाबा, जुहू येथील गांधी ग्राम, न्यू माहीम, साईबाबा पथ या चार शाळांच्या इमारतींचा त्यात समावेश असेल. यापैकी कुलाबा व जुहू येथील शाळांना अद्याप बहुमजली इमारत बांधण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. या इमारती मुंबई महापालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षातर्फे बांधण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या १५०० पेक्षा जास्त आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत निम्म्यापेक्षा अधिक नवीन चेहरे

तब्बल ११७ प्रथमच आले निवडून, केवळ १०० अनुभवी नगरसेवक मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल

मुंबई महापालिकेत पुन्हा महिलांचाच आवाज, १३० नगरसेविका आल्या निवडून

मुबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महिलांनी बाजी मारल्याचे दिसून येत असून या

तुरुंगातूनच विजयाचा गुलाल!

गंभीर गुन्ह्यातील उमेदवारांना मतदारांची पसंती मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मशीद, सँडहर्स्ट रोड आणि काही थांबे रद्द मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार?

शरद पवार गटाकडून हालचालींना सुरुवात मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर, आता सर्वच राजकीय

मुंबईत ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार

महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत.