वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल जलाशयाच्या ९०० मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीची अत्यावश्यक कार्यवाही मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. ही कार्यवाही वांद्रे पश्चिम येथील कुरेशी नगर झोपडपट्टीजवळ, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडातून तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगत जाणाऱ्या जलवाहिनीवर मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते मध्यरात्री १२ या एकूण १४ तासांच्या कालावधीत करण्यात येणार आहे. या दुरुस्ती कालावधीत एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १४ तास बंद राहणार आहे. तर, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.


एच पश्चिम विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून-गाळून प्यावे. महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणारा परिसर :


वांद्रे पश्चिमेकडील हिल मार्ग, पेरी मार्ग, मॅन्युअल गोन्साल्विस मार्ग, सेंट अँड्र्यूज मार्ग, सेंट पॉल मार्ग, कार्टर मार्ग, पाली गाव, चिंबई गाव, शेर्ली गाव, कांतवाडी परिसर.


खार दांडा, कोळीवाडा, दांड पाडा, चुईम गावठाण, गझदरबंध झोपडपट्टी, खार पश्चिमेचा काही भाग


हनुमान नगर झोपडपट्टी, लक्ष्मी नगर, कार्टर मार्ग, युनियन पार्क रस्ता क्रमांक १ ते ४, पाली हिल


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिसर, पाली पठार झोपडपट्टी, खारमधील १५ वा ते २० वा रस्ता परिसर


वांद्रे पश्चिमचा काही भाग म्हणजे चॅपल मार्ग, वेरोनिका मार्ग, डॉ. पीटर डायस मार्ग, सेंट जॉन बॅप्टिस्ट मार्ग


माउंट मेरी कॅथेड्रल, वांद्रे पश्चिम बाजूचे क्षेत्र रस्ता परिसर.


वांद्रे पश्चिम के. सी. मार्ग, एल. के. मेहता मार्ग, बाजार रस्त्याचा काही भाग, ए. के. वैद्य मार्ग


झिगझॅग मार्ग, कोल डोंगरी, नर्गिस दत्त मार्ग, पाली माला मार्ग



पाणीपुरवठा कमी दाबाने होणारा परिसर


हिल रोडच्या टोकापासून ताज लँड्स एन्ड, बी. जे. मार्ग, एच. के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि गणेश झोपडपट्टी. (मध्यरात्रीनंतर १ ते पहाटे ४.३० या वेळेत पाणीपुरवठा केला जाईल.)

Comments
Add Comment

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान