अॅक्शन चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करणार टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसू शकतो. त्याचा पहिला चित्रपट एक जागतिक अॅक्शन थ्रिलर असेल. या चित्रपटात तो हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन आणि थाई मार्शल आर्ट्स स्टार टोनी जा यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

अमेझॉन एमजीएम एक महत्त्वाकांक्षी संपूर्ण जगभर चालणारा प्रकल्प तयार करण्यासाठी चर्चा करत आहे ज्यामध्ये हे तीन अॅक्शन स्टार पहिल्यांदाच एकत्र येतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा एक जागतिक प्रकल्प आहे आणि तो अनेक भाषांमध्ये बनवण्याविषयी चर्चा केली जात आहे. सूत्रांनी असेही सांगितले की, टायगर, सिल्वेस्टर स्टॅलोन आणि टोनी जा यांच्याशी चर्चेचा पहिला टप्पा आधीच पार पडला आहे.

चित्रपटाच्या शीर्षकाबाबत चर्चा सुरू आहे; परंतु असे म्हटले जात आहे की चित्रपटाचे नाव भारतीय असेल. टायगर श्रॉफ त्याचा आदर्श सिल्वेस्टर स्टॅलोनसोबत अशा संपूर्ण जगातल्या अॅक्शन प्रोजेक्टमध्ये काम करण्यास उत्सुक आहे.

२०१७ मध्ये टायगरने त्याच्या आदर्श सिल्वेस्टर स्टॅलोनच्या क्लासिक चित्रपट ‘रॅम्बो’च्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्याची पुष्टी केली होती. तथापि, तो चित्रपट नंतर कधीच प्रत्यक्षात आला नाही. सिल्वेस्टर स्टॅलोनने यापूर्वी २००९ मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि करिना कपूर स्टारर ‘कंबख्त इश्क’मध्ये एक छोटीशी भूमिका केली होती.
Comments
Add Comment

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर