सुबोध भावे आणि मानसी नाईक जोडी प्रथमच एकत्र

सुबोध भावे आणि मानसी नाईक ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणणारा 'सकाळ तर होऊ द्या' या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. टीझरमध्ये झलक पाहिल्यानंतर या चित्रपटाची चर्चा अधिकाधिक रंगू लागली आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


निर्मात्या नम्रता सिन्हा यांनी श्रेय पिक्चर कंपनी अंतर्गत ‘सकाळ तर होऊ द्या’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून समिट स्टुडिओज आणि मधू शर्मा हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. आजवर हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या दिग्दर्शक आलोक जैन यांनी या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री केली आहे.


या चित्रपटातील सुबोध भावे आणि मानसी नाईक या दोन कलावंतांच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुणावणार असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. आपल्या मनातील प्रश्नांची उकल करण्यासाठी संपूर्ण समाजापासून अलिप्त राहणाऱ्या नायकाची कथा या चित्रपटात असल्याचे ट्रेलरच्या सुरुवातीच्या संवादांवरून समजते. अशातच नायकाच्या आयुष्यात नियती नावाच्या नायिकेची एन्ट्री होते. इथूनच विचार आणि भाव-भावनांचा एक अनोखा प्रवास सुरू होतो. नायकाने त्याच्या मनात साठवून ठेवलेले जाणण्याचा प्रयत्न नायिका करते.


नायक तिला एक काम करायला सांगतो जे ऐकून तिला धक्का बसतो. तो असे का सांगतो? याचे कोडे हा चित्रपट पाहिल्यावर उलगडणार आहे. आजवर कधीही न दिसलेल्या लुकमधील सुबोधची व्यक्तिरेखा उत्सुकता वाढवणारी आहे. मानसीने साकारलेली नियती कुतूहल वाढविणारी आहे. 'सकाळ तर होऊ द्या' चित्रपटाचे संवाद लेखन ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी केले असून छायांकन सुनील पटेल यांनी केले आहे. गीतकार अभिषेक खणकर यांनी लिहिलेल्या गीतांना गायक-संगीतकार रोहित राऊत यांनी संगीत दिले आहे.

Comments
Add Comment

Akshay Kumar Injured : 'भूत बंगला'च्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखापत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारला त्याच्या आगामी 'भूत बंगला'(Bhooth Bangla) या हॉरर-कॉमेडी सिनेमाच्या

Big Boss Marathi 6 : 'तिच्या भावना खोट्या वाटतात', राखी सांवतबद्दल सागर कारंडे म्हणाला...

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा चांगलाच गाजला असून आता बिग बॉस मराठीचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नुकताच

Marathi Entertainment : कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या 'पिक्चर बॉईज'चा धमाकेदार टीझर लाँच

मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीत कॉमेडीचा सुखद अनुभव देणाऱ्या पिक्चर बॉईज या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. १५

Dhurandar 2 : बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, आता 'या' OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार धुरंधर २

मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला असून सिनेमा रिलीज होऊन २१ दिवस उलटले असतानाही

Matka King : दमदार स्टारकास्ट असणाऱ्या नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : मराठी सिनेविश्वात सैराट, फॅन्ड्री, नाळ यांसारख्या सिनेमांमधून मातीतल्या वास्तववादी कथा

Shantecha Karte Chalu Aahe : लक्ष्मीकांत बेर्डेंचं अजरामर विनोदी नाटक, पुन्हा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज

मुंबई : रंगभूमीवर काही नाटकं प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. यांपैकीच'शांतेचं कार्टं चालू आहे' हे एक