Samaaan Capital चे शेअर्स IHL कडून भागभांडवल खरेदी केल्यानंतरही कोसळले

मोहित सोमण:अबू धाबीस्थित गुंतवणूक कंपनी इंटरनॅशनल होल्डिंग्स कंपनी (IHC) ने कंपनीतील ८८५० कोटी रुपयांचे भागभांडवल (Stake) खरेदी करण्यासाठी मेगा ओपन ऑफर दिली असूनही कंपनीच्या शेअर्समध्ये दिवसभरात आज ६ ते ७% घसरण झा ली आहे. अखेरच्या सत्रात बाजार बंद होताना सम्मान कॅपिटलचा शेअर २.६८% घसरून १६५.०३ रूपये प्रति शेअरवर स्थिरावला आहे. या गृहनिर्माण वित्त कंपनीच्या शेअर्समध्ये बीएसई वर ६% पेक्षा जास्त घट दिवसभरात झाली होती . क्रेडिट अँक्सेस आणि वि त्तीय समावेशनाचा चालक म्हणून आयएचसी (IHC) भारतातील एनबीएफसी (NBFC) क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहे तथापि गुंतवणूकदारांच्या भावनांवर फारसा परिणाम झाला नाही किंबहुना शेअर्समध्ये घसरण झाली.हे शेअर्स मंदीच्या स्थितीत व्यवहा र करत राहिले. सम्मान कॅपिटल (Sammaan Capital) चे शेअर्स दुपारपर्यंत ४.३२% ने कमी होऊन १६२.२० रुपयांवर व्यवहार करत होते. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईवर १५९ रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर गृहनिर्माण वित्त शेअरमध्ये किमान ६.२% ची घसरण झाली होती.


कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार (Regulartory Filings) अबू धाबीस्थित कंपनीने सन्मान कॅपिटल लिमिटेडमध्ये १ अब्ज डॉलर्स (८८५० कोटी रुपये) गुंतवणूक करण्याचा करार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आयएचसीने सन्मान कॅपिटलचे किमान ३४,१७,५४,२८६ इक्विटी शेअर्स खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर दिली आहे ज्यांचे दर्शनी मूल्य (Face Value) प्रत्येकी २ रुपये आहे, जे सार्वजनिक शेअरधारकांकडून विस्तारित मतदान शेअर भांडवलाच्या २६% प्रतिनिधित्व करतात. ही ओ पन ऑफर ४,७५०.३८ कोटी रुपये आहे. ऑफर किंमत १३९ रुपये प्रति शेअर आहे, जी सध्या २ ऑक्टोबरच्या १६९.५५ रुपयांच्या बंद किमतीपेक्षा १८.०१% सवलतीवर होती. संपूर्ण ओपन ऑफर रोख स्वरूपात दिली जाईल असे कंपनीने म्हटले होते. याशिवाय, आयएचसी दोन टप्प्यात सन्मान कॅपिटलमध्ये वॉरंट खरेदी करेल. पहिल्या टप्प्यात १३९ रुपयांच्या किमतीत ८,६८,९२,९६६ वॉरंट खरेदी केले जातील, ज्या प्रत्येकी १ (एक) इक्विटी शेअरची सदस्यता घेण्याचा अधिकार असेल.दुसऱ्या टप्प्यात १३९ रुपयांच्या किम तीत २१,९७,९७,५६९ वॉरंट खरेदी केले जातील, ज्या प्रत्येकी १ इक्विटी शेअरची सदस्यता घेण्याचा अधिकार असेल. हा व्यवहार भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारतीय स्पर्धा आयोगाच्या नियामक मंजुरी तसेच इतर पारंपारिक बंद होण्याच्या अटींच्या अधीन आहे.


बॉम्बे स्टॉक एक्सचेंज  (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियामध्ये सार्वजनिकरित्या सूचीबद्ध असलेली सन्मान कॅपिटल लिमिटेड ही देशातील सर्वात मोठ्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक आहे (एनबीएफसी),प्रामुख्याने गृहकर्ज देण्यावरल क्ष केंद्रित करते. कंपनी १५० हून अधिक शहरांमध्ये २२० शाखांद्वारे कार्यरत आहे, ज्यामध्ये ४४३० हून अधिक कर्मचारी आहेत, जे भारताच्या आर्थिक समावेशन (Financial Inclusion) आणि वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

Comments
Add Comment

मोठी बातमी: अभिजात मराठी भाषा सन्मान दिवशी जगभरातील पहिल्यावहिल्या समग्र मराठी ओटीटी अँप 'अभिजात मराठी' चे मुख्यमंत्री फडणवीसांचा हस्ते अनावरण

मोहित सोमण:आज अभिजात मराठी भाषा सप्ताहाची सुरूवात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 'या' दिवशी १० टक्के राहणार पाणीकपात

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

महाराष्ट्रात 'ई-बॉन्ड' क्रांती! व्यवसाय सुलभतेत सरकारचे 'मोठे' पाऊल

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाकांक्षी निर्णय आयात-निर्यात व्यवहारांसाठी आता डिजिटल बॉन्ड कागदी

डीपफेक व्हिडिओंचा गैरवापर: ऐश्वर्या-अभिषेकची थेट हायकोर्टात धाव, YouTube-Google कडे ४ कोटींची मागणी!

मुंबई: बॉलिवूडचे पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगल

Gold Silver Rate: रूपयांच्या घसरणीचा सोन्याला फटका तरीही आज सोनेचांदी स्वस्त 'या' कारणामुळे जाणून घ्या जागतिक विश्लेषण

मोहित सोमण: जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात डॉलरचे महत्व वाढले असल्याने पुन्हा एकदा रुपयात घसरण झाली. आज

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी