ठाकरे बंधूंच्या 'युती'आधीच राजकीय 'बॉम्ब'! 'युती'चा सस्पेन्स कायम!

महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने धुरळा नव्हे तर चक्क चिखलफेक पहायला मिळाली. सर्वांचं लक्ष लागलं होतं ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीकडे.. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या भाषणात युतीची मोठी घोषणा होईल, असं त्यांच्या समर्थकांना वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. युतीची गाडी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुटण्याऐवजी, युतीआधीच ती 'ब्रेक' झालीये. कारण, युतीच्या घोषणेपूर्वीच मुंबईच्या महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झालीय.

दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबतची स्पष्ट घोषणा केली नाही. त्यांनी फक्त इतकंच म्हटलं की, 'मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत, एकत्रच राहू.' 'युती झाली' किंवा 'युती करणार' असं ठोस विधान त्यांनी केलं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे राज ठाकरे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. युतीची घोषणा होईल, अशी चर्चा असतानाही राज ठाकरे शिवाजी पार्कच्या जवळ घर असूनही मेळाव्याला हजर राहिले नाहीत. यावरून हे स्पष्ट होतं की, राज ठाकरे अजूनही 'वाट पाहा आणि अंदाज घ्या' या भूमिकेत आहेत.

?si=RhQBhU6mD6EC-ZnN

राज ठाकरेंची ही संदिग्ध भूमिका का? कारण दोन आहेत. पहिलं म्हणजे जागावाटपाचा तिढा.. ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांना एकसारख्याच मराठीबहुल मतदारसंघात इंटरेस्ट आहे. मागच्या वेळेस शिवसेनेने जिंकलेल्या जागा मनसेला हव्या असू शकतात. हा जागावाटपाचा तिढा सुटल्याशिवाय राज ठाकरे युतीला वचन देणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे भाजपसोबतचे संबंध.. राज ठाकरेंचे भाजप आणि त्यांच्या नेत्यांशी असलेले वैयक्तिक संबंध देखील या निर्णयावर परिणाम करत आहेत. भाजपला वाटतंय की ते अजूनही राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबरोबर जाण्यापासून रोखू शकतात.

या परिस्थितीत, गमावण्यासारखं उद्धव ठाकरेंकडेच अधिक आहे. राज ठाकरे 'इप्सित हिस्सा' मागणारच आणि तोपर्यंत ते 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेणार. यामुळे युतीची घोषणा होण्याआधीच मुंबई महापालिका निवडणुकीचं वातावरण तापलंय. 'हिंदी सक्तीच्या विरोधात' ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हालचालींना वेग आला. पण, आता खुद्द महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू झालीये.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी 'मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार' असा विश्वास व्यक्त केला होता. तर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट घोषणा केलीय की, 'मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि मनसेचाच होणार.' यावर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सारवासारव करत, "कार्यकर्त्यांना जिद्दीने लढायला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक पक्ष असा विश्वास देतो," असं म्हटलंय. पण खरं सांगायचं तर, युती होण्यापूर्वीच महत्त्वाच्या पदांवरून असे जाहीर दावे होणं, हे महाविकास आघाडीच्या एकजुटीसाठी धोक्याची घंटा आहे.

युती झालीच तर महापौर कोणाचा? स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाकडे? यावर आता ठाकरेंच्या युतीचं भवितव्य ठरणार आहे. भाजपने एकीकडे 'महायुती' होणार असल्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीत हे अंतर्गत वाद सुरू आहेत. याचा फायदा भाजप आणि शिंदे गटाला नक्कीच होणार आहे. ठाकरे बंधूंची युती होण्यापूर्वीच जर महापौरपदावरून एवढी रस्सीखेच सुरू असेल, तर भविष्यात जागावाटपाचा आणि इतर पदांचा तिढा कसा सुटणार? अशा उलटसुलट चर्चा आता सुरु आहेत.
Comments
Add Comment

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 'या' दिवशी १० टक्के राहणार पाणीकपात

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई