पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे बेताल वक्तव्य, Pok खेळाडूबाबत म्हणाली असं काही...आता दिले हे स्पष्टीकरण


नवी दिल्ली: पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि सध्या समालोचक (Commentator) म्हणून काम पाहणाऱ्या सना मीर हिने वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ झाला आहे. दरम्यान, तिने यावर स्पष्टीकरणही दिले आहे. विश्वचषक सामन्यादरम्यान केलेल्या या विधानामुळे सोशल मीडियावर मात्र तिच्याविरोधात जोरदार गदारोळ झाला आहे.



नेमका काय आहे वाद?


महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मधील पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान सना मीर समालोचन करत होती. यावेळी, पाकिस्तानची खेळाडू नतालिया परवेझ हिच्याबद्दल बोलताना सना मीरने तिला "आझाद काश्मीर" मधून आलेली खेळाडू म्हणून संबोधले.


पाकव्याप्त काश्मीर (PoK) चा उल्लेख "आझाद काश्मीर" असा करणे, हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांनुसार, खेळाच्या मैदानावर किंवा समालोचनादरम्यान राजकीय टिप्पणी करण्यास सक्त मनाई आहे.



भारतीयांकडून संताप


सना मीरच्या या वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर मीरवर जोरदार टीका करत तिला समालोचन पॅनलमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. 'क्रिकेटमध्ये राजकारण आणू नका,' अशा प्रतिक्रिया भारतीय चाहत्यांनी दिल्या आहेत.



सना मीरने दिले स्पष्टीकरण


या वादावर स्पष्टीकरण देताना सना मीर म्हणाली की, "माझ्या टिप्पणीचा विपर्यास केला जात आहे. मी एका खेळाडूच्या प्रवासातील आव्हानं आणि तिच्या संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकण्यासाठी केवळ तिच्या मूळ गावाबद्दल (Home Town) बोलले होते. दूरच्या भागातून येणाऱ्या खेळाडूंना संधी मिळवण्यासाठी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे सांगण्याचा माझा हेतू होता."


 


सना मीरने जरी स्पष्टीकरण दिले असले तरी, हा मुद्दा आता क्रिकेटच्या नियमांनुसार राजकीय टिप्पणीच्या चौकटीत येतो की नाही, यावर आयसीसी काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Comments
Add Comment

Operation Sagar Bandhu | ‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे

इजिप्तमध्ये सापडले तीन हजार वर्षांपूर्वीचे ‘सोन्याचे शहर’

उत्खननात सोने वितळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भट्ट्यांचा समावेश कैरो : जगभरातील

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून पाकिस्तानमधील चमन आणि

अमेरिकेसाठी होणार सोशल मीडिया खात्यांची तपासणी; १५ डिसेंबरपासून नियम

न्यूयॉर्क : अमेरिकेत जायचे असेल, तर सोशल मीडियावर जपून पोस्ट करणे गरजेचे आहे. कारण, अमेरिकन व्हिसा मिळवताना सोशल

'बब्बर खालसा'ला ब्रिटन सरकारचा दणका

लंडन  : खलिस्तानवादी दहशतवादी संघटना बब्बर खालसाच्या आर्थिक नाड्या आवळल्यास ब्रिटन सरकारने सुरुवात केली. या

ट्रम्प प्रशासनाचे नवे धोरण अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी गैरसोयीचे

वॉशिंग्टन डीसी : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन हे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अनेक