आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे संपूर्ण देशभरात ई-सिम सेवा सुरू होणार आहे. ई-सिम हे एक डिजिटल सिम कार्ड आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये प्रत्यक्ष सिम कार्ड टाकण्याची गरज नसते. तुम्ही दूरस्थपणे मोबाइल कनेक्टिव्हिटी ॲक्टिव्हेट करू शकता. ज्यांच्याकडे ड्यूल-सिम फोन आहेत, ते लोक एकाच वेळी ई-सिम आणि नेहमीचे फिजिकल सिम कार्ड वापरू शकतील. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान लोकल ऑपरेटरशी कनेक्ट होण्यासाठी ही सेवा खूप फायद्याची ठरणार आहे. टाटा कम्युनिकेशन्सचा 'मुव्ह प्लॅटफॉर्म' या ई-सिम सेवेला तांत्रिक पाठबळ देणार आहे. यामुळे बीएसएनएलला त्यांच्या देशभरातील ग्राहकांसाठी ई-सिमची व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे.


बीएसएनएलच्या या ई-सिम सेवेमुळे ग्राहकांना टू-जी, थ्री-जी आणि फोर-जी सेवांसाठी क्यूआर कोड स्कॅन करून लगेच कनेक्टिव्हिटी मिळवता येईल. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए रॉबर्ट रवी यांनी सांगितले की, "देशभरात ई-सिम सेवा सुरू करणे हे आमच्या राष्ट्रीय दूरसंचार क्षमतेमधील एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या मदतीने आम्ही नागरिकांसाठी मोबाइल सेवा अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवत आहोत."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ओडिशाच्या झारसुगुडा येथून संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित बीएसएनएलच्या फोर-जी नेटवर्कचे उद्घाटन केले. यासाठी ९७ हजार ५०० हून अधिक मोबाइल टॉवर्स उभे करण्यात आले आहेत.


पोस्ट ऑफिसमध्ये सेवा: कंपनीने पोस्ट विभागासोबत करार करून देशातील १.६५ लाख पोस्ट ऑफिसमधून सिम कार्ड विक्री आणि मोबाइल रिचार्ज सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या नवीन ई-सिम सुविधेमुळे बीएसएनएलचे ग्राहक आता अधिक आधुनिक आणि डिजिटल सेवांचा लाभ घेऊ शकतील.

Comments
Add Comment

देशभरात ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगवर बंदी येणार ?

नवी दिल्ली: देशात वाढत्या ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

दुचाकीच्या धडकेत बसला भीषण आग! २० जणांचा मृत्यू, चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले दु:ख

आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून