
नुकतंच 'मनाचे श्लोक' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मराठी कलाकारही पुढे सरसावले आहेत. 'मनाचे श्लोक' चित्रपटाच्या टीम व्यतिरिक्त अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, अभिनेता श्रेयस राजे, अभिनेता प्रवीण तरडे आणि सोनू सूद हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत.