Gold Silver Rate: रूपयांच्या घसरणीचा सोन्याला फटका तरीही आज सोनेचांदी स्वस्त 'या' कारणामुळे जाणून घ्या जागतिक विश्लेषण

मोहित सोमण: जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात डॉलरचे महत्व वाढले असल्याने पुन्हा एकदा रुपयात घसरण झाली. आज अखेरच्या सत्रात रूपया ७ पैशाने घसरल्याने भारतीय रुपयाला अपेक्षित आधार मिळू शकला नाही. अमेरिकन स्थितीत सरकारी कर्म चाऱ्यांचे शटडाऊन, अस्थिरतेच्या तोंडावर सोन्यातील गुंतवणूकीला वाढलेले महत्व, सुरक्षित गुंतवणूकीचे साधन व सातत्याने रूपयात सुरू असलेली घसरण या कारणामुळे आज सोने अपेक्षित प्रमाणात घसरू शकले नसले तरी भारतातील मजबूत फंडामेंटलमुळे व रूपयातील वाढलेल्या दरपातळीमुळे सोन्याच्या मागणीत घसरण झाल्याने आज सोन्यात एकप्रकारे ' कंसोलिडेशन ' वर पोहोचले आहेत. व पर्यायाने,सततच्या वाढीला ब्रेक लागल्याने सोने आज स्वस्त झाले आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६५ रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४९ रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम सोने २४ कॅरेटसाठी ११८०४ रूपये, २२ कॅरेटसाठी १०८२० रूपये, १८ कॅरेट सोने ८८५३ रूपयांवर पोहोचले.


संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ६५० रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ६०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ४९० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे प्रति तोळा किंमत २४ कॅरेटसाठी ११८०४० रूप ये, २२ कॅरेटसाठी १०८२०० रूपये, १८ कॅरेटसाठी ,८८५३० रूपयांवर पोहोचला आहे. उपलब्ध माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी ११८२६ रूपये, २२ कॅरेटसाठी १०८४० रूपये, १८ कॅरेटसाठी ८९८० रुपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०३% वाढ झाली असून दरपातळी ११७६२० रुपयांवर पोहोचली आहे.


जागतिक बाजारातील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.५०% वाढ झाली असून जागतिक पातळीवरील मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.२०% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३८६४.४६ प्रति औंसवर गेली आहे. राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळात पारंपारिकपणे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाणारे सोने कमी व्याजदराच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करते. रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, या वर्षी या धातूच्या किमतीत आधीच ४७% वाढ झाली आहे दरम्यान, अमेरिकेतील सरकारी कामकाज बंद पडल्याचा (Shutdown) आज दुसरा दिवस होता.ज्यामुळे शुक्रवारी जाहीर होणाऱ्या बहुप्रतिक्षित बिगर-शेती वेतन डेटासह (Non Farm Pay Roll Data) प्रमुख आर्थिक अहवालांमध्ये विलंब होण्याची शक्यता नि र्माण झाली आहे असे जागतिक कमोडिटी तज्ञ म्हणत आहेत. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेने केलेल्या फेड व्याजदर कपातीमुळे आणि पुरवठ्यातील व्यत्ययासह कमकुवत डॉलरमुळे धातूंच्या किमतीत १.८% वाढ झाली आणि साप्ताहिक वाढ ३.९% झाली असे तज्ञांनी नमूद केले होते. त्यामुळे सोन्यातील दबाव पातळी निर्माण होत असताना आज मात्र भारतीय सराफा बाजारात काहीसा घटलेल्या मागणीमुळे दिलासा मिळाला असला तरी आगामी काळात आणखी सोन्यात रॅली अपेक्षित आहे.


या अस्थिरतेचा कालावधीत सोन्यावर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सोन्याच्या किमती सुमारे ₹६०० ने घसरून ११७००० रूपयांच्या आसपास सुरू झाल्यानंतर, किमती हळू हळू पुन्हा वर आल्या आणि ११७६०० रूपयांच्या जवळ व्यवहार करत असताना, सोन्याने जोरदार सुधारणा दर्शविली. या तीव्र घसरणीमुळे खरेदीदार घसरणीवर पाऊल टाकत आहेत, ज्यामुळे व्यापक वाढ अबाधित आहे. तथापि, आज यूएस नॉनफार्म पेरोल्स आ णि बेरोजगारी डेटाच्या प्रकाशनामुळे प्रमुख ट्रिगर पुढे आहे, ज्यामुळे उच्च अस्थिरता वाढण्याची अपेक्षा आहे. अलिकडच्या सत्रांमध्ये मजबूत ट्रेंडिंग किंमत कृती पाहता, तीव्र द्वि-मार्गी हालचाली नाकारता येत नाहीत. प्रमुख आधार ११६५०० आणि $३८४० वर आ हे, तर प्रतिकार (Resistance) ११८५०० आणि $३९०० वर दिसत आहे. एकूणच, सोने तेजीच्या रचनेत राहते परंतु डेटा रिलीजच्या आसपास अस्थिरता उंचावण्याची शक्यता आहे.'


आज चांदीच्या दरातही मोठी घसरण !


आज दिवसभरात चांदीच्या दरातही घसरण झाली. रूपयात घसरण सुरू असली तरी दुसरीकडे जागतिक स्तरावर डॉलर निर्देशांकही संध्याकाळपर्यंत काहीसा कमकुवत झाल्याने आज चांदीही घसरत संध्याकाळपर्यंत मर्यादित पातळीवर व्यवहार करत आहे. 'गु डरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात संध्याकाळपर्यंत २ रुपयांनी, व प्रति किलो दरात २००० रुपयांनी घसरण झाली. परिणामी चांदीचे प्रति ग्रॅम दर १५१ व प्रति किलो दर १५१००० रुपयांवर पोहोचला आहे. जागतिक बाजारपेठेत चां दीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.३४% वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०४% वाढ झाल्याने दरपातळी १४४७७२ रूपयांवर पोहोचली आहे. भारतीय सराफा बाजारात चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १५१० रूपये, तर प्रति किलो दर १५१००० रुपयांवर पोहोचले आहेत. जागतिक अस्थिरतेत चांदीतील चढ उतार मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने चांदीतही तुलनात्मकदृष्ट्या वाढ आगामी काळात अपेक्षित आहे.


चांदीच्या बाबतीत जागतिक विश्लेषण केल्यास,४६.०० डॉलरच्या अगदी खाली असलेल्या नीचांकी पातळीवरून आज उसळी घेतल्यानंतर चांदीने $४७.५० च्या वर ताज्या दैनिक उच्चांकावर जागतिक बाजारपेठेत पोहोचली आहे कारण अमेरिकन डॉलर सर्वत्र क मकुवत होताना आज दिसला. चांदीत सातत्याने तेजी सुरू असल्याने $४८.०३ वर ४ वर्षांचा उच्चांक (All time High) गाठत आहे.. शुक्रवारी गुरुवारी झालेल्या बहुतेक तोट्यांचा मागोवा घेण्यासाठी पुन्हा तेजीचा कल सुरू केला आहे, ज्याला अमेरिकन डॉलरची मंदी आली आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, गुरुवारी $४६.०० वर उसळी घेतल्यानंतर XAG/USD $४७.५० पातळीच्यावर सत्र उच्चांकावर पोहोचला आहे आणि $४८.०० च्या क्षेत्रात दीर्घकालीन उच्चांकाच्या जवळ येत आहे. फेडच्या आक्रमक टिप्पण्यांकडे गुंतवणू कदार दुर्लक्ष करत असल्याने मौल्यवान धातू तेजीत आहेत, ज्यामुळे आणखी दर कपातीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या आठवड्याच्या सुरुवातीला दिसणारे घसरलेले रोजगार आकडे आणि अमेरिकन सरकारच्या बंदमुळे गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या आ हेत की अमेरिकन मध्यवर्ती बँक ऑक्टोबरमध्ये आणि डिसेंबरमध्येही दर कमी करेल.

Comments
Add Comment

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर केंद्र सरकारचा इशारा: भारतावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून,

भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

पंतप्रधान मोदींची आरोग्य क्षेत्राला शाबासकी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतात क्षयरोग

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला. या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी तपास पथकाने

सिंहस्थ कुंभमेळा जगाच्या अध्यात्मिक नकाशावर भारताला अधोरेखित करणार

५,७५७ कोटी ८९ लाख रुपयांच्या विकासकामांचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते

टेलिग्राम हे दहशतवाद्यांसाठी नवीन चॅट डेस्टिनेशन

नवी दिल्ली : दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार बॉम्बस्फोटात सहभागी असलेले डॉ. उमर मोहम्मद आणि त्यांचे साथीदार