Thursday, October 2, 2025

प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, डॉक्टरांना हायकोर्टाचे आदेश

प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, डॉक्टरांना हायकोर्टाचे आदेश

चंदिगड : रुग्णाला कोणते औषध कसे घ्यावे, कोणत्या टेस्ट करुन घ्याव्या ? आदी सूचना देण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून देतात. डॉक्टरांच्या चिठ्ठीला प्रिसिक्रिप्शन म्हणतात. अनेक डॉक्टर हे प्रिसिक्रिप्शन हाताने लिहून देतात. डॉक्टरांचे हे लिखाण अनेक रुग्णांना व्यवस्थित वाचता येत नाही. औषध विक्रेत्यालाही कधी कधी प्रिसिक्रिप्शनमध्ये काय लिहिले आहे ? हे समजून घेण्यासाठी वेळ लागतो. काही वेळा समजत नाही. डॉक्टरांच्या या प्रिसिक्रिप्शनमधील अगम्य लेखनशैलीवर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने अर्थात हायकोर्टाने टिप्पणी केली आहे.

प्रिसिक्रिप्शन वाचताच आले नाही किंवा वाचतेवेळी चूक झाली तर रुग्णाच्या तब्येतीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने डॉक्टरांना सांगितले. सुवाच्य प्रिस्क्रिप्शन हा रुग्णांचा मूलभूत अधिकार असल्याचे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय म्हणाले.

डॉक्टरांचे हस्ताक्षर अनेकदा इतके खराब असते की लिहून दिलेले औषध कोणते आहे हेच समजत नाही. औषध विक्रेत्याकडून हे लिखाण वाचताना गडबड झाली तर चुकीचे औषध रुग्णाला दिले जाण्याची शक्यता निर्माण होते. यातून रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळेच डॉक्टरांनी वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात प्रिसिक्रिप्शन लिहून देणे आवश्यक आहे; असे न्यायमूर्ती जसगुरप्रीत सिंग पुरी म्हणाले.

डिजिटल प्रिस्क्रिप्शन प्रणाली लागू होईपर्यंत डॉक्टरांनी वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात प्रिसिक्रिप्शन लिहून देणे रुग्णाच्या आरोग्याच्यादृष्टीने हिताचे असल्याचे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सांगितले. हा नियम काटेकोरपणे अंमलात आणावा. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दोन वर्षांच्या आत हस्तलेखन प्रशिक्षण सुरू करावे; असेही पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सांगितले.

बलात्कार, फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या आरोपाखाली एका व्यक्तीने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. सरकार आणि संस्थांकडे इतके तंत्रज्ञान उपलब्ध असूनही, जर डॉक्टर अजूनही अस्पष्ट हस्ताक्षरात औषधे लिहून देत असतील तर ते अत्यंत चिंताजनक आहे. हा रुग्णाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >