न्यूयॉर्कमध्ये विमानतळावर दोन विमाने एकमेकांना धडकली; एक प्रवासी जखमी

वॉशिंग्टन : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात बुधवारी रात्री एक मोठा विमान अपघात टळला. ला गार्डिया विमानतळावर डेल्टा एअरलाईन्सच्या दोन फ्लाइट्स एकमेकांना धडकल्या. ही दोन्ही विमाने डेल्टा एअरलाइन्सच्या सहाय्यक कंपनी एंडेवर एअरद्वारे चालवली जात होती. या अपघातात एक प्रवासी जखमी झाला आहे. अपघातानंतर दोन्ही विमानांमधील प्रवाशांना खाली उतरवून बसद्वारे टर्मिनलपर्यंत नेण्यात आले. विमानतळ अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून, ही धडक स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे 9: 58 वाजता झाली, असे त्यांनी सांगितले.

अधिकार्‍यांच्या मते, एक विमान लँडिंगनंतर गेटकडे जात होते, तेव्हाच स्थानिक वेळेनुसार रात्री 9:58 वाजता दुसरे एक विमान, जे टेकऑफसाठी तयारीत होते, त्याला धडकले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये दिसून येते की एका विमानाचा पंख पूर्णपणे तुटलेला आहे. जखमी प्रवाशाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन्ही विमाने बॉम्बार्डियर CRJ-900 मॉडेलची होती.

डेल्टा एअरलाईन्सने दिलेल्या निवेदनानुसार, ही हळू गतीने झालेली धडक एंडेवर एअरच्या दोन फ्लाइट्समध्ये झाली. एक फ्लाइट (5047) नॉर्थ कॅरोलिनाच्या शार्लेटहून येत होती, आणि दुसरी फ्लाइट (5155) वर्जिनियाच्या रोअनोकसाठी रवाना होणार होती.

एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक माहितीनुसार फ्लाइट 5155 च्या एका पंखाने फ्लाइट 5047 च्या मुख्य शरीराला धडक दिली. एका फ्लाइट अटेंडंटला किरकोळ दुखापत झाली असून, त्याला घटनास्थळी प्राथमिक उपचार दिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. फ्लाइट 5155 मध्ये 28 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्ससह एकूण 32 लोक होते. तर फ्लाइट 5047 मध्ये 57 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्ससह 61 लोक होते.

सध्या, या धडकेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. विमानतळ प्रशासनाने सांगितले की, या घटनेचा विमानतळाच्या इतर कामकाजावर काहीही परिणाम झाला नाही. दोन्ही विमानांमधील प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवून शटल बसद्वारे टर्मिनलपर्यंत पोहोचवण्यात आले. एअरलाइन्सने हेही स्पष्ट केलं की ज्यांना गरज होती, त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, गुरुवारी त्यांच्या नवीन फ्लाइट्सची व्यवस्था केली गेली.

डेल्टा एअरलाइन्सने अधिकृत विधान करत म्हणाले “आमची टीम न्यूयॉर्क ला गार्डिया हबवर प्रवाशांची काळजी घेत आहे. एंडेवर एअरने चालवलेल्या दोन विमानांमध्ये झालेल्या या हळू गतीच्या धडकेची चौकशी सुरू असून, आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य करू. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे प्रवासी आणि कर्मचारी यांची सुरक्षा. या गैरसोयीबद्दल आम्ही आमच्या प्रवाशांची माफी मागतो.”

Comments
Add Comment

Amazon Data Center : Amazon च्या डेटा सेंटरवर इराणच्या हल्ल्याचा दावा; AWS सेवांवर परिणामाची चर्चा, मात्र अधिकृत पुष्टी नाही

तेहरान : इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने बहरीनमधील Amazon Web Services (AWS) च्या महत्त्वाच्या डेटा

Afghanistan Floods : अफगाणिस्तानात भीषण पुराचा तडाखा: २० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक बेपत्ता; बचावकार्य सुरू

काबुल: अफगाणिस्तानमध्ये सोमवारी अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान २० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक

Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये मुंबईच्या कंपनीच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ४ भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली : युक्रेन-रशिया युद्धाच्या (Ukraine-Russia War) पार्श्वभूमीवर भारताला मोठा धक्का बसला आहे. युक्रेनमधील ओडेसा बंदर

India Iran : तेहरानचा प्रवास पुढे ढकला, इराण तातडीने सोडा', भारतीय दूतावासाची नागरिकांसाठी सूचना

तेहरान: अमेरिकेसोबतचा युद्धविराम संपल्याची घोषणा झाल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला

Russia Attack on Kyiv : कीववर रशियाचा भीषण क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

कीव : रशियाने कीववरील ड्रोन हल्ल्याला अवघ्या २४ तासांत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या जोरदार हल्ल्याने

Iran - America War : नेतन्याहूंना अटक करण्याचा विचार ? न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांच्या वक्तव्याने खळबळ

आल्बनी : न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी एका मुलाखतीत कथितपणे असे म्हटले आहे की, आगामी संयुक्त