पाकव्याप्त काश्मीर पेटला! लष्कराची सुद्धा केली नाकांबदी; पीओकेत पाक सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार ; १० जणांचा मृत्यू तर १०० जखमी

जीवनावश्यक वस्तूंवरील सबसिडी रद्द केल्याने जनक्षोभ उसळला!


आंदोलकांकडून सैनिकांचा 'मानवी ढाल' म्हणून वापर


इस्लामाबाद: पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये मूलभूत हक्क आणि वाढत्या महागाईवरून सरकारविरुद्ध हिंसक निदर्शने सुरू असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. जीवनावश्यक वस्तूंवरील अनुदान (Subsidies) कमी केल्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या जमावाने तब्बल २५ सुरक्षा कर्मचाऱ्यांना ओलीस (Hostage) ठेवले आहे. या सैनिकांचा आंदोलकांकडून 'मानवी ढाल' (Human Shield) म्हणून वापर केला जात असल्याने, सुरक्षा दलांना त्यांच्याविरुद्ध कोणतीही थेट कारवाई करता येत नाही.


या चार दिवसांच्या हिंसक आंदोलनांमध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून, १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, ज्यात तीन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सरकारने आंदोलन दडपण्यासाठी इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद केली असून, संपूर्ण भागात अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन लावला आहे.



बुधवारी गोळीबार, निदर्शकांवर अत्याचाराचे आरोप


निदर्शने थांबवण्यासाठी सुरक्षा दलांनी बुधवारी निशस्त्र लोकांवर गोळीबार केल्याचे समोर आले आहे, ज्यात १० जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले. या गोळीबारात तीन पोलीस अधिकारी देखील ठार झाले. आंदोलकांनी असा गंभीर आरोप केला आहे की, गुप्तचर संस्था शांततामय आंदोलन मोडून काढण्यासाठी छुपे हल्ले करत आहेत.


जम्मू आणि काश्मीर संयुक्त अवामी कृती समिती (JKJAAC) च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. आंदोलक सरकारवर मूलभूत अधिकारांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि महागाई नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचा थेट आरोप करत आहेत. सध्या आंदोलकांचा मोठा जमाव PoK ची राजधानी मुझफ्फराबादकडे कूच करत आहे.



सरकार आणि लष्करावर थेट हल्ला


अवामी अॅक्शन कमिटीचे ज्येष्ठ नेते शौकत नवाज मीर यांनी थेट इस्लामाबाद आणि पाकिस्तानी सैन्यावर हल्ला चढवला आहे. मीर म्हणाले की, "पाकिस्तान सरकार आणि लष्कर स्थानिक लोकांचा आवाज दडपत आहेत आणि सामान्य जनतेवर अत्याचार करत आहेत." त्यांनी लष्कराची तुलना लोकांचे प्राण घेणाऱ्या 'जादूटोण्याशी' केली आहे. सत्तेतील लोक फक्त श्रीमंत आणि विशिष्ट वर्गाचा फायदा पाहतात, तर सामान्य काश्मिरी जनतेला सतत दबाव सहन करावा लागत आहे, असे मीर म्हणाले.


मीर यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या एका जुन्या विधानाचाही उल्लेख केला, ज्यात त्यांनी हिंदूंना 'काफिर' (अधर्मी) म्हटले होते. मीर यांनी या विधानाला पाकिस्तानच्या दुटप्पी वृत्तीचे उदाहरण ठरवले.



आंदोलकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?


JKJAAC ने सरकारसमोर ३८ सूत्री मागणीपत्र ठेवले आहे, ज्यात भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि लष्कराच्या अत्याचारांवर बंदी घालण्याची मागणी प्रमुख आहे. त्यांच्या तीन मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत.


राखीव जागा रद्द करा: पाकिस्तानात स्थायिक झालेल्या काश्मिरी निर्वासितांसाठी PoK विधानसभेत राखीव असलेल्या १२ जागा रद्द कराव्यात. (या जागांमुळे स्थानिक लोकांचे प्रतिनिधित्व कमी होते आणि त्याचा फायदा केवळ काही कुटुंबांनाच होतो, असा आंदोलकांचा दावा आहे.)


वीज आणि स्थानिक फायदे: वीज प्रकल्पांमध्ये स्थानिक लोकांचे फायदे विचारात घेतले पाहिजेत.


अनुदान (सबसिडी) परत आणा: महागाईमुळे लोक त्रस्त असल्याने पीठ (गहू) आणि वीज बिलांवर सवलत (अनुदान) पुन्हा सुरू करावी.



'हा प्लॅन A आहे; प्लॅन D धोकादायक असेल'


JKJAAC नेते शौकत नवाज मीर यांनी पाकिस्तान सरकारला कडक इशारा दिला आहे. "आमची मोहीम ७० वर्षांपासून नाकारलेल्या मूलभूत हक्कांसाठी आहे. एकतर आम्हाला आमचे हक्क द्या, नाहीतर लोकांच्या रोषाला सामोरे जा," असे ते म्हणाले. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना भरपाई आणि सरकारी नोकऱ्या देण्याची मागणीही केली. मीर यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारला धमकी देत म्हटले की, "हा संप 'प्लॅन ए' आहे. लोकांचा संयम संपला आहे आणि आमच्याकडे बॅकअप प्लॅन आहेत. प्लॅन डी खूप धोकादायक असेल."


पाकिस्तान सरकारने या भागात पत्रकार आणि पर्यटकांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसेच, स्थानिक पत्रकारांनाही तटस्थ कव्हरेज देण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप होत आहे. मानवाधिकार संघटनाही या मुद्द्यावर आवाज उठवत आहेत. 'या आंदोलनाचे रूपांतर स्वातंत्र्याच्या मागणीत होऊ शकते,' या भीतीने सरकारने इंटरनेट बंद केले आहे. PoK मध्ये यापूर्वीही वीज आणि अनुदानाच्या मुद्द्यांवर अनेकदा मोठी निदर्शने झाली आहेत, परंतु यावेळी आंदोलनाचा धोका अधिक वाढलेला दिसत आहे.

Comments
Add Comment

सौदी अरेबियामध्ये मोठा निर्णय; ‘कफला’ पद्धतीचा शेवट, भारतीय कामगारांना मोठा दिलासा

सौदी अरेबिया : सौदी अरेबियामध्ये गेल्या ५० वर्षांपासून अस्तित्वात असलेली कफला पद्धत अखेर रद्द करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये अचूक फेकला 'टोमॅटो बॉम्ब'

पाकिस्तानमध्ये टोमॅटाचा भाव गगनाला भिडला, एक किलोसाठी मोजावे लागत आहेत ७०० रुपये! कराची : भारतात झालेल्या

ट्रम्प यांचा ८८ लाख रुपयांचा एच-१बी 'व्हिसा बॉम्ब' आजपासून लागू, जाणून घ्या कोणाला सूट मिळणार

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, H-1B

पाकिस्तानमध्ये ४.७ तीव्रतेचा भूकंप; अनेक घरांचे नुकसान

इस्लामाबाद: सोमवारी पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार,

फिलीपिन्समध्ये फेंगशेन वादळ, १४,००० लोक बेघर; ७ जणांचा मृत्यू

मनिला : उत्तर आणि मध्य फिलिपिन्समध्ये आलेल्या उष्णकटिबंधीय वादळ ‘फेंगशेन’मुळे किमान ७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

भीषण अपघातात विमान धावपट्टीवरून थेट समुद्रात कोसळलं

मुंबई : अहमदाबाद विमान अपघातानंतर अलीकडे सतत विमान अपघातांची संख्या वाढलेली दिसते. हवाई प्रवास हा सुखकर,