येथे आजपासून लागू झालेल्या प्रमुख नियमांचे तपशील दिले आहेत:
एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरात वाढ
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतात. त्यानुसार, ऑक्टोबर २०२५ च्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे.व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १६ रूपयांपर्यंतची वाढ झाली आहे.मात्र, घरगुती १४ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, ते दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलले
रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये दलाली आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी IRCTC ने नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. ऑनलाइन जनरल तिकीट रिझर्व्हेशन सुरू झाल्यानंतर, पहिली १५ मिनिटे फक्त आधार कार्ड व्हेरिफाय (Aadhaar Verified) असलेल्या प्रवाशांनाच तिकीट बुक करता येणार आहे. हा नियम तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांवर आधारित आहे. यामुळे दलालांना तिकीट बुकिंगमध्ये मिळणारा फायदा कमी होईल आणि सामान्य प्रवाशाला तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल.
UPI मध्ये मोठा बदल - 'कलेक्ट रिक्वेस्ट' बंद
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरकर्त्यांसाठी हा एक मोठा बदल आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सुरक्षितता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
UPI वरील 'कलेक्ट रिक्वेस्ट' (Collect Request) किंवा 'पुल ट्रान्झॅक्शन' (Pull Transaction) हे फीचर आजपासून बंद केले जाईल.
यामुळे आता Google Pay, PhonePe किंवा इतर UPI ॲप्स वापरून कोणाकडूनही थेट पैसे मागण्याची (Request Money) सुविधा उपलब्ध राहणार नाही. ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) आणि फिशिंगचे (Phishing) प्रकार रोखणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
इंडिया पोस्ट: स्पीड पोस्टचे दर आणि सुरक्षा वाढली
भारतीय टपाल विभागाने (India Post) स्पीड पोस्ट (Speed Post) च्या दरात सुधारणा केली असून, सुरक्षितता वाढवण्यासाठी ओटीपी (OTP) आधारित डिलिव्हरीची सुविधा सुरू केली आहे.स्पीड पोस्टचे दर वाढले आहेत. तसेच, डिलिव्हरी करताना ग्राहकाला ओटीपी देणे अनिवार्य केले आहे, ज्यामुळे पार्सलची सुरक्षा वाढेल.