सोनम कपूर पुन्हा आई होणार? सेकंड प्रेग्नन्सीबाबत चर्चेला उधाण!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर हिच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचे क्षण येणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहूजा आपल्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. याबद्दल ती लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.


सोनम आणि आनंद आहूजा यांनी २०१८ मध्ये लग्न केले. २०२२ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचा वायुचा जन्म झाला. आई झाल्यापासून तिच्या आयुष्यात मोठा बदल झाल्याचे ती अनेक वेळा सांगत आली आहे. आता ती दुसऱ्यांदा मातृत्वाचा अनुभव घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सोनम आणि आनंद सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असून, त्यांचे मुंबई आणि दिल्लीमध्ये सततचे येणेजाणे असते.


सोनमने आपल्या पहिल्या बाळासोबतचे अनेक खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर काही आठवड्यांतच तिच्या दुसऱ्या गरोदरपणाच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘ऑगस्ट महिना म्हणजे वायुचा महिना’ असं म्हणत तिने वायुसोबतचे फोटो शेअर करत भावनिक पोस्टही लिहिली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, सोनम सध्या साधारण तीन महिन्यांची गर्भवती आहे. अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी, चाहत्यांमध्ये ती कधी ही गोड बातमी शेअर करणार, याची उत्सुकता आहे.


सोनमने २००७ मध्ये 'सांवरिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने 'आएशा', 'खूबसूरत', 'वीरे दी वेडिंग', 'दिल्ली-६' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. सोनम आणि आनंद या जोडीला बॉलिवूडमधील एक परफेक्ट कपल म्हणून ओळखले जाते.


सध्या सोनमच्या दुसऱ्या बाळाच्या चर्चांमुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे आणि उत्सुकतेचे वातावरण आहे. लवकरच कपूर-आहूजा कुटुंबात पुन्हा एक नवा पाहुणा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या

रितेश देशमुखने शब्द पाळला; पाठपुरावा करुन मृत ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला केली लाखमोलाची मदत!

मुंबई : 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साताऱ्याजवळ कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सौरभ

The Ganeshutsav Podcast : 'The Ganeshutsav Podcast' (TGP) चा डंका! चिराग चंद्रकांत खिलारे यांनी जगातील पहिले 'हिंदू उत्सव' पॉडकास्ट सुरू करून मूर्तिकारांना दिले व्यासपीठ

मुंबई : भारतातील समृद्ध उत्सव संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी १७ जुलै २०२४ रोजी 'TGP (The Ganeshutsav Podcast)' या विशेष

"मला कधी लग्न करायचं नव्हतं पण..." पॉलाच्या एका मेसेजनं बदललं सारंगचं आयुष्य

पुणे : भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या लोकप्रिय मराठी यू ट्यूब चॅनलचा संस्थापक आणि अभिनेता सारंग साठे याने

Booby Deol : "नर्व्हस झालो, अक्षरशः घाम फुटलेला!"- 'आश्रम 3' मधील बोल्ड सीनबद्दल बॉबी देओलचा खुलासा; चाहत्यांना धक्का!

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सध्या त्याच्या अभिनय कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. ऐन तारुण्यात