अमेरिकेच्या टॅरिफनंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार

मॉस्को : अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातविषयी वाद सुरू असतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. पुतिन आगामी 5 व 6 डिसेंबर रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात द्विपक्षीय भेट होणार आहे.


अमेरिकेबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांच्या भारत भेटीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढू शकते. या भारत दौऱ्यापूर्वी होणाऱ्या शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव देखील भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.


संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या सत्रात ( युएनजीए) सर्गेई लावरोव यांनी जाहीर केले की, डिसेंबरमध्ये रशियाचे अध्यक्ष भारत भेटीवर येणार आहेत. यावेळी त्यांनी भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.त्यामध्ये व्यापार, लष्करी व तांत्रिक सहकार्य, वित्तीय व्यवहार, मानवीय विषय, आरोग्यसेवा, हाय-टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), आणि एससीओ व ब्रिक्सया आंतरराष्ट्रीय मंचांवरील समन्वय यांचा समावेश आहे.


लावरोव म्हणाले, “आम्ही भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांचा पूर्ण आदर करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे हितसंबंध पुढे नेण्यासाठीचे परराष्ट्र धोरणही आम्हाला मान्य आहे. आम्ही भारताशी उच्च पातळीवर सातत्याने संपर्कात असतो.” रशियन तेलाच्या आयातीवरून अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफबाबत बोलताना लावरोव म्हणाले, “भारत आणि रशियाची आर्थिक भागीदारी धोक्यात नाही. पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट सांगितले आहे की भारत आपल्या भागीदारांची निवड स्वतः करतो.” लावरोव पुढे म्हणाले, “जर अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार वाढवण्याबाबत अमेरिकेच्या काही अटी असतील, तर आम्ही त्या अटींवर चर्चा करण्यास तयार आहोत. पण जेव्हा विषय भारत आणि तिसऱ्या देशामधील असतो, तेव्हा भारत फक्त संबंधित देशांसोबतच चर्चा करण्याला प्राधान्य देतो.”

Comments
Add Comment

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

सिंधुदेशाच्या मागणीवरून वातावरण तापलं, पाकिस्तानची फाळणी होणार ?

इस्लामाबाद : सिंधी संस्कृती दिनाचे औचित्य साधून कराचीमध्ये 'सिंधुदेश'च्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या

कट्टरतेकडे झुकत असलेला बांगलादेश होत आहे कर्जबाजारी

  ढाका : बांगलादेशमध्ये शेख हसिना यांचे बहुमतातले सरकार होते. पण शत्रू देशांच्या मदतीने बांगलादेशमधील

मुलीसाठी नग्न होऊन युद्धाचा भयंकर खेळ, जीव जाईपर्यंत… लग्नाची अजब परंपरा माहिती आहे का

  इथिओपिया : आफ्रिकेतील जमाती आपल्या खास परंपरांसाठी चर्चेत असतात. यातील काही परंपरा या खूप विचित्र असतात. आज

Operation Sagar Bandhu | ‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे

इजिप्तमध्ये सापडले तीन हजार वर्षांपूर्वीचे ‘सोन्याचे शहर’

उत्खननात सोने वितळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भट्ट्यांचा समावेश कैरो : जगभरातील