ओला, उबर चालकांचे आझाद मैदानात आंदोलन


मुंबई : ओला, उबर, रॅपिडो या ॲपआधारित कॅब अथवा बाईक सेवा देणाऱ्या चालकांना योग्य दर मिळावेत यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. कंपन्यांकडून होणारा अन्याय रोखण्यासाठी राज्य सरकारने या चालकांसाठी निश्चित दर लागू करावेत, या मागणीसाठी मुंबईसह उपनगरातील कॅब चालकांनी आझाद मैदानात आंदोलन केले. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भेटीसाठी वेळ द्यावा, अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे. लवकर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.


सरकारने ॲपआधारित कॅब अथवा बाईक सेवांसाठी दर निश्चित करावेत, ते दर लागू न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी. त्यांना काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्यांचा कॅब आणि बाईकचे परवानचे रद्द करावेत; अशी मागणी आंदोलक करत आहेत. ‘सरकारने केवळ ई-बाइक टॅक्सीला मुभा दिली आहे. त्यानुसार प्रोव्हिजनल लायसन्स देण्यात आले. रस्त्यांवर पेट्रोल बाइक टॅक्सींवर प्रवासी वाहतूक सुरू आहे. यामुळे कंपन्यांकडून सरकारच्या अटी-शर्तींचा भंग झाला आहे. यात कंपन्यांनी परिवहन विभागाने निश्चित केलेले भाडेदर अॅपमध्ये दाखवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारण्यात येत आहे’, असा आरोप भारतीय गिग कामगार मंचाने केला आहे. तर मुंबई महानगर क्षेत्रात बेकायदा बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. चालकांकडून दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. वारंवार आंदोलन करुन कारवाई झाली नसल्याचे आरोप केले तरी त्यात तथ्य नाही, असे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे म्हणणे आहे.


Comments
Add Comment

मागील दोन वर्षापेक्षा धरण क्षेत्रात कमी साठा, पण वर्षभराची तहान भागणार....

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी जो पाणीसाठा आवश्यक असतो, तो साठा १ऑक्टोबर रोजी

कांदिवली आगीत सहा महिलांचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी): कांदिवली येथील केटरिंग किचनला लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेल्या सर्व सहा महिलांचा मृत्यू

Mumbai Local Automatic Door video : नव्या लोकलचा मेकओव्हर! लोकलचा पहिला VIDEO व्हायरल, आता स्टेशन येताच आपोआप.... नवी लोकल पाहून व्हाल थक्क

मुंबई : मुंबईकरांची 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये

पुढील तीन ते चार दिवसांत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ६० लाख हेक्टरचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत ने

महापालिका आरोग्य विभागाला माणसांपेक्षा श्वानांची चिंता!

रेबीज नियंत्रणासाठी श्वानांचे लसीकरण, पण चावा घेतलेल्यांना मिळत नाही लस मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबईला सन वर्ष

जय शहांचे नाव घेत शिंदे सेनेवर टीका करणा-या ठाकरेंच्या नेत्याला भाजपने सोलून काढले

मुंबई: दसरा (विजयादशमी) मेळाव्याच्या आयोजनावरुन उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना जय शहा