मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यासर्व धरणांमधील पाणी साठा हा १४ लाख २८ हजार ५४९दशलक्ष लिटर अर्थात १लाख ४२ हजार ८५४ कोटी लिटर एवढा जमा झाला आहे. जुलै महिन्यांपासूनच या सर्व तलावांमधील पाणी साठा हा मागील दोन वर्षांच्या तुलने दुपटीने पुढे होता. त्यामुळेकाही दिवस धरणाचे दरवाजे उघडून त्यातील पाणी सोडण्याची वेळ आली होती. पण शेवटच्या तीन ते चार दिवस धरण क्षेत्रात पाऊस न पडल्याने धरणातील साठा जो २७ सप्टेंबर रोजी जेवढा होता, त्यात वाढ होण्याऐवजी तो कमी झाला. त्यामुळे २७सप्टेंबर रोजी या सर्व धरणातील पाणी साठा ९९.१३ टक्के एवढा होता, जो आता कमी होऊन ०१ ऑक्टोबर रोजी ९८.७० टक्क्यांवर जाऊन पोहोचला.
विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यापूर्वी पाण्याची पातळी घटल्यानंतर पाणीकपात लागू न करता पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात आला. आणि अपेक्षेपेक्षा तलाव धरण क्षेत्रात अधिक पाऊस पडून ऑगस्टमध्येच सराव धरण काठोकाठ भरली गेली होती. त्यामुळे
०१ ऑक्टोबर रोजीचा मागील तीन वर्षांतील पाणी साठा
सन २०२५ : ९८. ७० टक्के( १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर)
सन २०२४ : ९९.३७ टक्के ( १४ लाख ३८ हजार २२७ दशलक्ष लिटर)
सन २०२३ :९९.१८टक्के (१४ लाख ३५ हजार ४५९ दशलक्ष लिटर)