ICC Womens World Cup : भारतीय संघाची विजयी सलामी

गुवाहाटी : भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात शानदार पद्धतीने केली. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव करत भारताने विजयी सलामी दिली आहे. फंलदाजी आणि गोलंदाजीची आपली जादू दाखवणारी दीप्ती शर्मा ही बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने कठीण परिस्थितीतून बाहेर पडून आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सुरुवातीच्या विकेट गमावल्यानंतर दीप्ती शर्मा (८७ धावा) आणि अमनजोत कौर (५७ धावा) यांनी सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी करून संघाला बळकटी दिली. हरलीन देओल (४८) आणि प्रतीका रावल (३७) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

डीएलएस पद्धतीने २७१ धावांचे लक्ष्य ठेवणाऱ्या श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकांत २११ धावांतच गारद झाला. फक्त कर्णधार चामारी अटापट्टू (४३), निलाक्षी डी सिल्वा (३५) आणि हर्षिता समरविक्रमा (२९) यांनाच काहीसा प्रतिकार करता आला.गोलंदाजीत दीप्ती शर्माने तीन विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इतर गोलंदाजांनी सातत्याने दबाव कायम ठेवला आणि भारताला विजय साकारुन दिला.

Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या