मोहित सोमण:जागतिक अस्थिरतेचे वारे सोन्याच्या दरातही झळकू लागले आहेत. तसेच चांदीला भौगोलिक परिस्थितीत मागणी वाढल्याने सोनेचांदी आज सर्वोच्च शिखरावर (All time High)व र पोहोचले. प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात भूराजकीय (Geopolitical) अस्थिरता, युएस डॉलरमधील व राजकीय अस्थिरतेचा यांचा एकत्रित परिणाम मौल्यवान कमोडिटीत झाला आहे.सकाळी मो ठ्या प्रमाणात वाढलेला डॉलर निर्देशांक संध्याकाळपर्यंत घसरला असला तरी भारतीय रूपयातील घसरण आज सोन्याच्या भारतीय सराफा बाजारपेठेतील वाढीसाठी निर्णायक ठरली. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९२ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८५ रुपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६९ रूपये वाढ झाली आहे. त्यामु ळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ११६४० रूपये, २२ कॅरेटसाठी ८५ रूपये, १८ कॅरेटसाठी ८७३० रूपयांवर पोहोचले आहेत.
संकेतस्थळावरील माहितीनुसार, प्रति तोळा २४ कॅरेट सोन्याच्या दरात ९२० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ८५० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ६९० रुपयांनी वा ढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी ११६४०० रूपये, २२ कॅरेटसाठी १०६७०० रूपये, १८ कॅरेटसाठी ८७३०० रुपयांवर पोहोचला आहे. आज भारतीय सराफा बाजारातील मुंबईस ह प्रमुख शहरातील प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी ११६४० रूपये, २२ कॅरेटसाठी १०७०० रूपये, १८ कॅरेटसाठी ८८६० रुपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीए क्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत थेट १.१९% वाढ झाल्याने दरपातळी ११६२६० रुपयांवर पोहोचली आहे.
जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.०४% वाढ झाली आहे. जागतिक सोन्याच्या दरांचे मानक (Standard) असलेल्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १. ५८% वाढ झाली असून प्रति डॉलर दरपातळी ३८१८.५७ औंसवर गेली आहे. आज मोठ्या प्रमाणात सोन्यात वाढ झाल्याने सोने नव्या उच्चांकावर पोहोचले. विशेषतः डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि या वर्षी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आणखी कपात करेल या वाढत्या अपेक्षांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीही उच्चांकावर पोहोचल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी दिले ल्या माहितीनुसार सीएमई फेडवॉच टूल असे सूचित करते की ऑक्टोबरमध्ये फेडकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता ९०% आणि डिसेंबरमध्ये पुन्हा कपात होण्याची शक्यता ६५% आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात युएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांनी २५ पूर्णांशाने कपात केल्याची घोषणा केली होती. याशिवाय आगामी नॉन पे रोल डेटाकडे गुंतवणूकदारांनी आपले लक्ष केंद्रित केल्याने सोन्याकडे पुनः एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात असल्याने गोल्ड स्पॉट बेटिंगमध्ये आजही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. भारतातील मोठ्या प्रमाणात आज ईटीएफ गुंतवणूकीत वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सणासुदीच्या काळात यात आणखी वाढ होऊ शकते. उद्या आरबीआयच्या रेपो दरातील निर्णयाचा परिणाम कमोडिटी बाजारात होणे अपे क्षित आहे.
युएस बाजारातील राजकीय अस्थिरताचा फटकाही कमोडिटीत बसत आहे. वॉशिंग्टनमध्ये वाढत्या राजकीय अस्थिरतेमुळे सुरक्षित आश्रयस्थानांचा प्रवाह वाढल्याने सोन्याच्या किमती ऐतिहासिक पातळीवर पोहोचल्या आहेत. राजकीय परिपेक्षातील खोलवरच्या मतभेदांना अधोरेखित करत आहे जो आर्थिक अहवालांना विलंब होण्याची शक्यता वाढवतो असेही युएस बाजारातील तज्ञ तूर्तास म्हणत आहेत. युएस बाजारपेठांना आता अशी भीती आहे की सप्टेंबरमधील कामगार बाजाराचा डेटा पुढे ढकलला जाऊ शकतो, ज्यामुळे फेडरल रिझर्व्हला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार नाही.
दरम्यान, अलीकडील अमेरिकन डेटाने अर्थव्यवस्थेची ताकद अधोरेखित केली आहे, जीडीपी वाढ आणि ग्राहक खर्च अंदाजांपेक्षा (PCE) आकडेवारी जास्त आहे. या निर्देशांकातील वाढीमुळे आक्रमक फेड दर कपातीची अपेक्षा कमी झाली आहे. डिसेंबरपर्यंत बाजाराची किंमत आता सुमारे ४० बेसिस पॉइंट्सने कमी आहे, जी आधीच्या दोन कपातीच्या अंदाजांपेक्षा कमी आहे. तरीही, सरकारी बंद पडण्याच्या धोक्यामुळे नवीन अनिश्चितता वाढत असल्याने डॉलर दबावाखाली आहे.
आता लक्ष नोकऱ्या उघडणे, खाजगी वेतन आणि आयएसएम सर्वेक्षणांसह प्रमुख यूएस डेटा रिलीझकडे वळले आहे. हे अहवाल कामगार बाजाराची आणि व्यापक अर्थव्यवस्थेची ताकद मोजतील. विशेषतः, आगामी नॉनफार्म पेरोल्स अहवाल, वेळेवर जाहीर झाल्यास, फेडरल रिझर्व्हच्या धोरण मार्गासाठी महत्त्वपूर्ण वजन देतो. मऊ निकाल (Soft Results) सुलभतेच्या घाड बळकटी देती ल, तर मजबूत आकडेवारी दर सवलतीला विलंब करू शकतो असे कमोडिटी तज्ञ म्हणत आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये गुंतवणूकदार अनिश्चित वातावरणात सुरक्षितता शोधत असल्याने सोन्याचे स्था न गुंतवणूकीतील दृष्टीने अनुकूल असले तरी ते सध्या या कारणामुळे उच्चांकी पातळीवर गेले आहे.
आजच्या सोन्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे, एमसीएक्स चा भाव ११०० ते ११५००० रूपयांपर्यंत वाढून ११५००० पर्यंत पोहोचला आहे आणि कॉमेक्स गोल्ड १.२०% वाढून $३८१४ वर पोहोचला आहे. गेल्या शुक्रवारी यूएस पीसीई किंमत निर्देशांकात झाले ल्या वाढीमुळे या तेजीला पाठिंबा मिळाला होता, ज्यामुळे आगामी बैठकीत फेडने आणखी एक दर कपात करण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.११३५००-११६५०० रूपयांच्या ट्रेडिंग रेंजसह आउ टलुक तेजीत आहे. या आठवड्यात मुख्य लक्ष यूएस नॉनफार्म पेरोल्स, एडीपी रोजगार डेटा आणि १ ऑक्टोबर २०२५ रोजी आरबीआयच्या धोरण घोषणेवर असेल.'
सोने आताच्या घडीला खरेदी करावे का?
कमोडिटी तज्ञांच्या मते,जवळच्या काळात सोन्याच्या किमती अस्थिर राहतील अशी अपेक्षा तज्ज्ञांना आहे, परंतु सोन्याच्या किमतीत झालेली घसरण ही खरेदीची संधी आहे कारण सोन्याचा मध्यम ते दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक दिसत आहे.
चांदीच्या दरातही मोठी वाढ !
आज चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चांदीत वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात जागतिक अस्थिरतेसह चांदीच्या गुंतवणूकीत लोकांचा वाढलेला कल,औ द्योगिक मागणी व घसरत असलेला पुरवठा यामुळे चांदी महागत आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यानंतर व आलेल्या आकडेवारीनंतर सोन्याहून अधिक ग्राहकांच्या पसंतीस चांदी उत रल्याने कमोडिटीत मोठी मागणी निर्माण झाली. ईटीएफ गुंतवणूकीत झालेल्या वाढीमुळे व वाढलेल्या डॉलरमुळे आज सोन्याच्या दराबरोबर चांदीच्या दरातही आज वाढ झाली. 'गुडरिटर्न्स' संकेत स्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १ रुपयांनी व प्रति किलो दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १५० रूपये, प्रति किलो दर १५०००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय सराफा बाजारात चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १६०० रूपये, प्रति किलो दर १६०००० रुपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या नि र्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.८३% वाढ झाल्याने दरपातळी १४३०६३.०० पातळीवर गेली. जागतिक बाजारपेठेत चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.५७% वाढ झाली आहे. ए मसीएक्स चांदीचा डिसेंबरचा फ्युचर्स प्रति किलो १४४१७९ रूपये या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे.