क्रिस वोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू क्रिकेटपटू क्रिस वोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. वोक्स २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा भाग होता. दोन महिन्यांपूर्वी त्याने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त हाताने फलंदाजीही केली होती.

वोक्सने तिन्ही फॉरमॅटमधील जर्सी घातलेला आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याने लिहिले, "इंग्लंडकडून खेळणे आनंददायी आहे. माझ्या कारकिर्दीत मला कोणताही पश्चात्ताप नाही. वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे असे मी ठरवले आहे."

वोक्सने पुढे लिहिले, "मी लहानपणापासून इंग्लंडकडून खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करू शकलो हे माझे भाग्य आहे. इंग्लंडकडून खेळत असलेल्या माझ्या १५ वर्षांच्या काळात, मी अनेक चांगले मित्र बनवले आणि हेच माझ्यासाठी खास आहे."

२०११ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या माझ्या पदार्पणाची आठवण फार जुनी नाही. पण जेव्हा तुम्ही खेळाचा आनंद घेता तेव्हा वेळ निघून जातो." दोन विश्वचषक जिंकणे आणि अनेक अ‍ॅशेस मालिकांचा भाग असणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. माझ्या सहकाऱ्यांसोबतचे सेलिब्रेशन आणि आठवणी माझ्यासोबत कायम राहतील.

ख्रिस वोक्सने इंग्लंडला २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात आणि त्यानंतर २०२२ च्या टी-२० विश्वचषकात नेतृत्व केले होते. वोक्सने २०११ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि ४ ऑगस्ट रोजी भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

ओव्हल येथे झालेल्या भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान त्याला दुसऱ्या डावात दुखापतीसह फलंदाजी करावी लागली. तो नाबाद राहिला. पण गस अ‍ॅटकिन्सन १७ धावांवर बाद झाला. ज्यामुळे इंग्लंडला हा सामना ६ धावांनी गमवावा लागला. वोक्सने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ३७०५ धावा केल्या आणि ३९६ विकेट्स घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन