लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त ‘१२० बहादुर’चा दुसरा टीझर प्रदर्शित

मुंबई : भारताची स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओज यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा दुसरा टीझर ‘१२० बहादुर’ प्रदर्शित केला आहे. दमदार मोशन पोस्टरनंतर आलेला हा नवीन टीझर रोमांच आणि थराराने परिपूर्ण आहे.


टीझरमध्ये “ए मेरे वतन के लोगों” या अमर गीताची गूंज ऐकायला मिळते. कवी प्रदीप यांनी १९६२ च्या भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांसाठी हे गीत लिहिले होते आणि लता मंगेशकर यांच्या आत्मीय स्वरांनी त्याला अमरत्व दिले. याच युद्धावर आधारित आहे ‘१२० बहादुर’ची कथा. हा चित्रपट रेजांग ला येथील ऐतिहासिक लढाई, त्यात चार्ली कंपनीच्या सैनिकांचे शौर्य, बंधुत्व आणि बलिदान यांचे चित्रण करतो. टीझरमधील प्रत्येक फ्रेममध्ये सैनिकांचा जाज्वल्य उत्साह आणि अढळ धैर्य प्रकर्षाने दिसते.


चित्रपटात फरहान अख्तर हे मेजर शैतानसिंह भाटी यांची भूमिका साकारत आहेत. १३ कुमाऊ रेजिमेंटच्या जवानांसह त्यांनी शत्रूंच्या प्रचंड सैन्याशी सामना करत शौर्याचा इतिहास घडवला होता. चित्रपटाचे चित्रीकरण लडाखच्या निसर्गरम्य दऱ्यांमध्ये झाले असून त्यामुळे त्याचा दृश्यात्मक प्रभाव अधिक प्रभावी ठरला आहे.





या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले असून निर्माते आहेत रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर. ‘१२० बहादुर’ ही केवळ एक युद्धकथा नाही तर रेजांग ला येथील त्या अनामिक शूरवीरांना मोठ्या पडद्यावर वाहिलेली एक भावपूर्ण आदरांजली आहे, ज्यांचे शौर्य आजही पिढ्यानपिढ्या प्रेरणा देते.


हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस सिनेमागृहांमध्ये येणार आहे.

Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत

‘दृश्यम ३’मधील कराराचा भंग केल्याप्रकरणी ‘धुरंधर’ अक्षय खन्नाला नोटीस

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला