विजयच्या प्रचारसभेत चेंगराचेंगरी, ३० पेक्षा जास्त मृत्यू

करूर : तामिळनाडूतील करूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. तामीळ सुपरस्टार आणि तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके)चा प्रमुख विजयने शनिवारी करूर येथे प्रचार केला. प्रचारसभेवेळी अफाट गर्दीत चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली आणि श्वास कोंडल्यामुळे दुर्घटना झाली, अनेकजण बेशुद्ध पडले. अनेक टीव्हीके कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिक एकामागून एक बेशुद्ध पडले. बेशुद्ध झालेल्यांना तातडीने करूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेकांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.





टीव्हीके प्रमुख विजयने शनिवारी प्रचारासाठी करूरला भेट दिली. त्याला बघण्यासाठी आणि त्याचे भाषण ऐकण्यासाठी हजारो नागरिक जमले होते. करूर द्रमुकचा गड आहे. या ठिकाणी विजयच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. याच अफाट गर्दीत चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली आणि श्वास कोंडल्यामुळे दुर्घटना झाली, अनेकजण बेशुद्ध पडले.


विजयच्या भाषणानंतर काही वेळातच गर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेक लोक बेशुद्ध पडले. रिपोर्टनुसार, उष्णता, पाण्याचा अभाव आणि गर्दीमुळे अनेक महिला, पुरुष आणि मुलं बेशुद्ध झाली. बेशुद्ध झालेल्या लोकांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. करूर सरकारी रुग्णालयात एकाच वेळी दहापेक्षा जास्त रुग्णवाहिका आल्या आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. डॉक्टरांनी अनेकांवर वेगाने आपत्कालीन उपचार केले. आतापर्यंत ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच करूर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सरकारी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांशी संवाद साधला तसेच रुग्णांच्या नातलगांना धीर दिला. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी त्री अनबिल महेश यांना करूरला जाण्याचे आदेश दिले.


पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक


विजयच्या प्रचारसभेत चेंगराचेंगरी झाली आणि ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्ट करुन शोक प्रकट केला.




Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींच्या हस्ते BSNLच्या स्वदेशी 4G सेवेचे लोकार्पण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘4G’

सोनम वांगचुकचे पाकिस्तान आणि बांगलादेश कनेक्शन, तपास सुरू

नवी दिल्ली : लडाख या केंद्रशासित प्रदेशातील हिंसेप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या सोनम

बरेलीत दंगल, मौलाना तौकीरला अटक; ४८ तासांसाठी इंटरनेट बंद

बरेली : उत्तर प्रदेशमधील बरेलीत शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर दंगल भडकली होती. नमाज अदा करुन आलेल्यांनी हिंसा

Bullet Train Update : २०२७ मध्ये 'हाय स्पीड' प्रवास! रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा; सुरत-बिलीमोरा टप्पा कधी सुरू होणार?

नवी दिल्ली : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे स्वप्न आता खऱ्या अर्थाने वास्तवाकडे वाटचाल करत

Google 27th Birthday : गूगलचा २७ वर्षांचा प्रवास! 'गॅरेज स्टार्टअप' ते 'टेक्नॉलॉजी पॉवरहाऊस'; डूडलने दिली नॉस्टॅल्जियाची भेट.

कॅलिफोर्निया : टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्वात मोठे नाव आणि जगातील सर्वात शक्तिशाली सर्च इंजिन असलेल्या गूगलने

'I Love Muhammad' च्या बॅनरवरून सुरू झालेला वाद अखेर कोर्टात; देशभर गाजत असलेले हे प्रकरण आहे तरी काय?

शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई, हिंदुत्वाने 'I Love Mahadev' ने दिले प्रत्युत्तर; दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका