Saturday, September 27, 2025

विजयच्या प्रचारसभेत चेंगराचेंगरी, ३० पेक्षा जास्त मृत्यू

विजयच्या प्रचारसभेत चेंगराचेंगरी, ३० पेक्षा जास्त मृत्यू

करूर : तामिळनाडूतील करूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. तामीळ सुपरस्टार आणि तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके)चा प्रमुख विजयने शनिवारी करूर येथे प्रचार केला. प्रचारसभेवेळी अफाट गर्दीत चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली आणि श्वास कोंडल्यामुळे दुर्घटना झाली, अनेकजण बेशुद्ध पडले. अनेक टीव्हीके कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिक एकामागून एक बेशुद्ध पडले. बेशुद्ध झालेल्यांना तातडीने करूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेकांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

टीव्हीके प्रमुख विजयने शनिवारी प्रचारासाठी करूरला भेट दिली. त्याला बघण्यासाठी आणि त्याचे भाषण ऐकण्यासाठी हजारो नागरिक जमले होते. करूर द्रमुकचा गड आहे. या ठिकाणी विजयच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. याच अफाट गर्दीत चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली आणि श्वास कोंडल्यामुळे दुर्घटना झाली, अनेकजण बेशुद्ध पडले.

विजयच्या भाषणानंतर काही वेळातच गर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेक लोक बेशुद्ध पडले. रिपोर्टनुसार, उष्णता, पाण्याचा अभाव आणि गर्दीमुळे अनेक महिला, पुरुष आणि मुलं बेशुद्ध झाली. बेशुद्ध झालेल्या लोकांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. करूर सरकारी रुग्णालयात एकाच वेळी दहापेक्षा जास्त रुग्णवाहिका आल्या आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. डॉक्टरांनी अनेकांवर वेगाने आपत्कालीन उपचार केले. आतापर्यंत ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच करूर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सरकारी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांशी संवाद साधला तसेच रुग्णांच्या नातलगांना धीर दिला. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी त्री अनबिल महेश यांना करूरला जाण्याचे आदेश दिले.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

विजयच्या प्रचारसभेत चेंगराचेंगरी झाली आणि ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्ट करुन शोक प्रकट केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा