सोनम वांगचुकचे पाकिस्तान आणि बांगलादेश कनेक्शन, तपास सुरू


नवी दिल्ली : लडाख या केंद्रशासित प्रदेशातील हिंसेप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या सोनम वांगचुकचे पाकिस्तान आणि बांगलादेश कनेक्शन असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात तपास सुरू असल्याची माहिती लडाखचे पोलीस महासंचालक एस.डी. सिंग जामवाल यांनी दिली. वांगचुक विरूद्धच्या तपासात आतापर्यंत जे काही आढळले ते सुरक्षेच्या कारणांमुळे सध्या सार्वजनिक करता येणार नाही. पण सोनमने मागील काही दिवसांत लडाखमध्ये अनेक चिथावणी देणारी भाषणं केली आहे. ही भाषणं आजही यू ट्युब तसेच इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याचे लडाखचे पोलीस महासंचालक एस.डी. सिंग जामवाल म्हणाले. लडाखमध्ये अशांतता निर्माण करणे या एकाच हेतूने वांगचुक काम करत होता, असेही जामवाल म्हणाले.


सोनम वांगचुक पाकिस्तान आणि बांगलादेशमधील विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात होता. लडाखमध्ये वांगचुकच्या नेतृत्वात सुरू असलेल्या कारवायांचे अहवाल नियमितपणे पाकिस्तान आणि बांगलादेशमधील विशिष्ट व्यक्तींकडे जात होते. त्याचे अनेक आर्थिक व्यवहार संशयास्पद आहे. यामुळेच सोनम वांगचुकच्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख (एसईसीएमओएल) या संस्थेचे एफसीआरए लायसन्स (परकीय योगदान नियमन कायद्यांतर्गत दिलेला परवाना) केंद्रीय गृह मंत्रालयाने रद्द केले आहे. सरकारी यंत्रणा सोनम वांगचुकच्या आणि त्याच्या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा कसून तपास करत आहे.


लडाख या केंद्रशासित प्रदेशाला भारतीय संविधानातील कलम सहा (आर्टिकल सिक्स) अंतर्गत स्वायत्त राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी करत सोनम वांगचुकने केंद्र सरकार विरोधात हिंसक आंदोलनासाठी चिथावणी दिली. यामुळे लडाखमध्ये हिंसा भडकली. या हिंसेत चार जणांचा मृत्यू झाला आणि ९० जण जखमी झाले. सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कायदा सुव्यवस्था बिघडली. या सर्व गंभीर आरोपांतर्गत लेह पोलिसांनी कारवाई केली. हिंसक आंदोलनासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी लेह पोलिसांनी सोनम वांगचुकला अटक केली. सोनम विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Gujrat Car Video : गुजरातच्या पठ्ठ्याचा भन्नाट जुगाड; चक्क कारलाच बनवलं '1BHK' घर, एकदा हा व्हिडिओ पाहाच

अहमदाबाद : सध्या देशभरात कार मॉडिफिकेशनचं वारं वाहत असलं तरी गुजरातच्या एका पठ्ठ्याने मात्र कल्पकतेच्या सर्व

Sikkim Landslide : भूस्खलनात अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी भारतीय लष्कराचे युद्धपातळीवर प्रयत्न

- भारतीय लष्कराकडून 'ऑपरेशन हिम सेतू'ला सुरुवात भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने उत्तर सिक्कीममधील लाचेन

Gangster Atiq Ahmed : प्रयागराज हादरलं! गँगस्टर अतीक अहमदच्या ड्रायव्हरची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी अतीक अहमदचा (Gangster Atiq Ahmed) ड्रायव्हर, मोहम्मद इरफान,

Parth Pawar Rajya Sabha MP Oath : गुलाबी जॅकेट अन् डोळ्यांवर चष्मा...हुबेहूब अजित दादा! पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळाली. दिवंगत अजित

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)