मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD) प्राप्त झालेल्या पूर्वामानानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात २७ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये ऑरेज आणि रेड अर्लट असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असून २८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात २७ सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ आणि २८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नागरिकांना आवाहन:-
* नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत सूचनांचे पालन करावे.
* धोकादायक भागात जाणे टाळावे.
* पूर प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे.
* वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे.
* पुरापासुन बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी.
* पुराच्या आपत्तीपासुन वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे.
* पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे.
* पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना, रस्ता ओलांडू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अनुमानुसार संभाव्य पूर परिस्थिती निमार्ण होण्याची शक्यता असलेले जिल्ह्यांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक-
१. धाराशीव-०२४७२-२२७३०१
२. सोलापूर- ०२१७-२७३१०१२
३. बीड-०२४४२-२९९२९९
४. अहिल्यानगर ०२४५-२३२३८४४
५. परभणी-०२४५२-२२६४००
६. नांदेड-०२४६२-२३५०७७
७. गडचिरोली-०७१३२-२२२०३१
८. रायगड ८२७५१५२३६३
९. रत्नागिरी- ७०५७२२२३३
१०. पालघर- ०२५२५- २९७४७४
११. सिंधुदुर्ग-०२३६२ - २२८८४७
१२. ठाणे- ९३७२३३८८२७
१३. पुणे- ९३७०९६००६१
१४. सातारा-०२१६२ - २३२३४९
१५. कोल्हापूर-०२३१ - २६५९२३२
१६. लातूर- ०२३८२ - २२०२०४
१७. मुंबई शहर आणि उपनगर- १९१६/०२२ ६९४०३३४४.
मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र २४X७ अधिकारी/कर्मचारी उपलब्ध कार्यरत आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संपर्क क्रमांक:- ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९, ९३२१५८७१४३.