सुबोध भावे साकारणार निम करोली बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या ‘श्री बाबा नीब करोरी महाराज’ या बायोपिक चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाद्वारे तो प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांची भूमिका साकारणार आहेत.


या चित्रपटाचा पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यात सुबोध भावे नीम करोली बाबा यांच्या रूपात दिसत आहेत. लांब केस, दाढी, कपाळावर टीका आणि अंगावर घोंगडी असा त्याचा लूक पाहताच प्रेक्षकांनी त्याची दखल घेतली आहे. बाबांच्या प्रतिमेसारखाच दिसत असल्याने पोस्टरला मोठा प्रतिसाद मिळत आहे.


नीम करोली बाबा हे देश-विदेशातील सुप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आहेत. उत्तराखंडमधील कँची धाम हा त्यांचा आश्रम विशेष प्रसिद्ध असून अनेक नामांकित व्यक्तींनी येथे भेट दिली आहे. विराट कोहली, अनुष्का शर्मा, मार्क झुकरबर्ग यांसारख्या नामवंत व्यक्तीदेखील त्यांचे भक्त राहिले आहेत. या बायोपिकमधून त्यांच्या जीवनप्रवासावर आणि अध्यात्मिक कार्यावर प्रकाश टाकला जाणार आहे. सुबोध भावे यांनी आतापर्यंत मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांतून विविध व्यक्तिरेखा साकारल्या असल्या तरी हिंदी सिनेसृष्टीतली ही त्यांची मोठी पायरी ठरणार आहे. त्यांच्या या नव्या प्रवासाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित

अरेरे! १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैष्णोदेवी यात्रेला पुन्हा लागला ब्रेक

जम्मू काश्मीर: १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या माता वैष्णोदेवीच्या यात्रेला पुन्हा एकदा पुढील आदेश येईपर्यंत

आरोहच्या अंतर्मनातील महापूर

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल रेगे चित्रपटाने प्रसिद्धीस आलेला कलाकार म्हणजे आरोह वेलणकर. महापूर नावाचं नाटक तो

itel A90 लिमिटेड एडिशन लाँच मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शनसह ७००० रूपयांत लाँच

MIL STD 810H - सह मिलिटरी-ग्रेड टफनेस आणि धूळ, पाणी आणि थेंब प्रतिरोधकतेचे 3P कंपनीकडून आश्वासन परवडणाऱ्या किमतीत