गौरव मोरेची फिल्टरपाड्याच्या चाळीतून थेट टॉवरमध्ये एन्ट्री !

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा मराठमोळा अभिनेता गौरव मोरे याने आपल्या आयुष्यातील एक मोठे स्वप्न पूर्ण केले आहे. मुंबईच्या ‘फिल्टर पाडा’ येथील चाळीतून प्रवास करत आता त्याने पवईमधील एका आलिशान टॉवरमध्ये स्वतःचे हक्काचे घर मिळवले आहे.


गेल्या वर्षी म्हाडा मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये गौरवने कलाकार कोट्यातून अर्ज भरला होता. त्याला पवई येथील उच्च उत्पन्न गटातील घर लॉटरीतून मिळाले. घराचे बांधकाम व ‘ऑक्युपन्सी सर्टिफिकेट’ (OC) मिळण्यात झालेल्या विलंबामुळे गौरवला वर्षभर वाट पाहावी लागली, मात्र अखेर २५ सप्टेंबर २०२५ रोजी त्याला त्याच्या नवीन घराच्या चाव्या मिळाल्या.


गौरव मोरेने या क्षणाबद्दल भावना व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली. तो म्हणतो "फिल्टरपाडा ते पवई हा प्रवास बघताना खूप छोटा वाटतो, पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली आहेत. जिथे राहतो तिथेच आपल घर असावं हे कायम मनात होतं. लहानपणापासून वाटत होतं जिथे राहतो तिथेच घर घ्यायचं आणि आज ते स्वप्न खर्‍या अर्थाने सत्यात उतरलं. काल, दिनांक २५-९-२०२५ रोजी आम्हाला आमच्या पवईच्या नवीन घराचा ताबा मिळाला.


ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे. काल घरच्यांना त्या घराचा आनंद घेताना पाहून मन भरून आलं आणि वाटलं, आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केलं. माझी नाळ कायम फिल्टरपाडा आणि पवईसोबत जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही.


माझं हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी @mhadaofficial चे मनापासून आभार मानतो."


गौरवच्या या प्रवासाने अनेक नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळत आहे, चिकाटीने प्रयत्न केल्यास स्वप्नं नक्कीच पूर्ण होतात.



गौतमी देशपांडेलाही मिळाली नवीन घराची चावी


गौरव मोरेप्रमाणेच ‘माझा होशील ना’ फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे हिलाही म्हाडा लॉटरीतून घर मिळाले आहे. तिला गोरेगावमधील घराचा ताबा मिळालेला आहे.


म्हाडाच्या या उपक्रमामुळे अनेक कलाकारांना आणि सामान्य नागरिकांना आपले घर घेण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळत आहे, आणि गौरव, गौतमीसारख्या कलाकारांचे यश त्याचे जिवंत उदाहरण आहे.

Comments
Add Comment

Girija Oak Godbole : निळ्या साडीतील गिरिजा ओक बनली 'नॅशनल क्रश'! सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एक्स (X),

धर्मेंद्र यांची कोट्यावधींची मालमत्ता! कोण होणार 'वारसदार'?

मुंबई: अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज

बॉलीवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती स्थिर

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत आहे. मात्र यावेळी

धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी

Gautami Patil : नृत्य नाही, आता शौर्य! गौतमी पाटीलचं 'नऊवारी' गाणं रेकॉर्ड ब्रेक, चाहत्यांकडून तुफान लाईक्स

मुंबई : आपल्या दमदार नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील

'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या