मोठी बातमी: ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची 'ही' नवी तीन तीन गिफ्ट मिळणार

प्रतिनिधी: दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा होण्याची शक्यता आहे. अद्याप तारीख समोर आली नसली तरी या विषयी अधिकृत घोषणा ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित आहे. याखेरीज सरकारच्या आकडेवारीनुसार डीए (Dearness allowance DA) वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही घोषणेसोबत आणखी एक घोषणा आठव्या वेतन आयोग (8th Pay Commission) विषयक अंमलबजावणी बाबतीत दर घोषित होऊ शकता त.नुकत्याच सरकारने फिटमेंट समितीकडून वेतन आयोगात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. अद्यारूढ महागाई आधारे भत्ता वाढवण्याचा निर्णय ही सरकारची समिती घेत असते. त्यामुळे जुलै महिन्यातील एआयसीपीआय (AICPI) या महागाई निर्देशां कानुसार, जुलै महिन्यातील महागाई भत्ता (DA) ५८% वर पोहोचला आहे. यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना ५५% डीए घोषित झाला होता. दिवाळीपूर्व काळात आता हा भत्ता ३% वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दिवाळी बोनसही सरकारी कर्मचाऱ्यांना मिळ णार आहे. त्यामुळे ही दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खरी दिवाळी ठरणार आहे.सरकारने यापूर्वीच जीएसटी कपात केल्याने वस्तूंचे दरही स्वस्त केले असल्याने व कर्मचाऱ्यांच्या कमाईत वाढ होत असल्याने मोठ्या प्रमाणात याचा फायदा ग्राहक बाजारात हो ऊ शकतो. वाढलेल्या बचतीचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांनाही होईल. एकूणच ग्राहक व व्यापारी यांच्यासाठी ही विन विन (Win Win) परिस्थिती आहे.


१) 8th Pay Commission- सरकारने हे १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्याचे ठरवले आहे. याविषयी सरकार अधिकृत माहिती प्रकाशित करू शकते असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,पुढील महिन्यात सरकार टी ओआर (Terms of Reference ToR) घोषित करू शकते. तसेच अधिकृत घोषणाही वित्त आयोगाची पुढील महिन्यात होईल अशी अटकळ आहे.


२) दिवाळी बोनस - वित्त आयोगाच्या शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही मिळणार आहे. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार पीएलबी (Productive Linked Bonus) देते. विना राजपत्रित कर्मचाऱ्यांना (Non Gazetted) हा लाभ होतो. नुकत्या च झालेल्या घोषणेनुसार सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना हा पीएलबी घोषित केला होता. त्यामुळे दिवाळी बोनसही सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षित आहे.


३) डीए वाढ- डीअरनेस अलाऊन्स (DA) हा १ जानेवारी २०२५ पासून कर्मचाऱ्यांना ५५% महागाई भत्ता मिळत आहे. आता जुलै-डिसेंबर २०२५ चा दुसरा हप्ता ठरवायचा आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या आकडेवारीनुसार, जुलै म हिन्याचा महागाई भत्ता ५८% पर्यंत पोहोचू शकतो. दिवाळीपूर्वी, सरकार ३ टक्के महागाई भत्ता वाढ जाहीर करू शकते, म्हणजेच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५% वरून ५८%पर्यंत वाढेल असे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

IND vs BAN : क्रूर पाऊस! ICC महिला विश्वचषकात भारताचा विजय हुकला; बांगलादेश पराभवापासून वाचला, बांगलादेश विरुद्धचा सामना रद्द

नवी मुंबई : आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना अखेर पावसामुळे

Dividend Ex Date Today: आज ९ कंपन्यांच्या शेअर्सची एक्स डेट जाहीर 'या' तारखेपूर्वीच्या लाभार्थ्यांना लाभांश मिळणार !

प्रतिनिधी:आज २७ ऑक्टोबरला नऊ कंपन्यांच्या शेअरवर लाभांशासाठी कंपन्यांनी एक्स डेट जाहीर केली आहे. त्यामुळे या

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या

केवळ ऑपरेशन सिंदूर नाही तर आर्थिक आघाडीवर पाकिस्तान बरबाद गुंतवणूक काढून जागतिक कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन सुरूच

प्रतिनिधी: ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारत आर्थिक आघाडीवरही पाकिस्तानची पीछेहाट करत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या

Coforge Q2FY26 Share: कोफोर्जने निकाल जाहीर करताच शेअर आज ६% इंट्राडे उच्चांकावर उसळला

मोहित सोमण: शनिवारी टेक्नॉलॉजी (आयटी) कंपनी कोफोर्ज लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर्समध्ये