रील बनवणे पडले महागात, पाच जणांचा बुडून मृत्यू

पाटणा : बिहारमधील गयाजी येथे गुरुवारी (२५ सप्टेंबर) एक मोठी दुर्दैवी घटना घडली. खिजरसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत केनी पुलाजवळ, रील (व्हिडीओ) बनवण्याच्या नादात ९ मुलं नदीत बुडाली. यामध्ये ५ मुलांचा मत्यू झाला आहे.

माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (२५ सप्टेंबर) केनी घाटाजवळ घडली आहे. हि सर्व मुलं शाळेतून परत येत होती, आणि त्याच वेळी व्हिडीओ (रील) बनवण्यासाठी नदीच्या काठावर गेली, आणि बुडायला लागले.मुलांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले. मोठ्या प्रयत्नांनंतर सर्वांना बाहेर काढण्यात आलं.यानंतर सर्व मुलांना तातडीने बेलागंज प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर यातील दोन मुलांना पुढील उपचारासाठी अनुग्रह नारायण मगध मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आलं, तर उर्वरित सात मुलांना बेलागंज आरोग्य केंद्रातच दाखल करण्यात आलं.त्यामधून पाच मुलांचा मृत्यू झाला आहे आणि दोन मुलांवर उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, या मुलांपैकी काही ११वीत शिकत होते तर काही १२वीत.

नीमचक बथानी उपविभागीय अधिकारी (एसडीएम) केशव आनंद यांनी सांगितले की, ब्लॉक अधिकारी आणि पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत ६ मुलांची ओळख पटली असून तौसीफ, जासिफ, साहिल, जैम,सुफियान आणि साजिद अशी या मुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, उर्वरित माहिती जिवंत वाचलेल्या मुलांच्या जबाबानंतर स्पष्ट होईल. या मुलांमध्ये कोणी सख्खे भाऊ होते का, किंवा काहीजण एका कुटुंबातील होते का, याचा तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या