Dashavtar Movie : प्रत्येक थिएटर हाउसफुल्ल; सर्वत्र ‘दशावतार’चीच चर्चा

मुंबई : झी स्टुडियोजची प्रस्तुती असलेल्या आणि सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित 'दशावतार’ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात हाऊसफुल्ल शोजने धमाकेदार सुरुवात केलेल्या या चित्रपटाचा उत्साह तिसऱ्या आठवड्यातही अजिबात कमी झालेला नाही. उलट दिवसेंदिवस वाढतच आहे. बॉक्स ऑफिसवर भरभरून कमाई करत असलेला हा चित्रपट केवळ कथानकामुळेच नाही, तर प्रभावी मांडणी, दमदार अभिनय आणि आपल्या संस्कृतीशी जोडणाऱ्या आशयामुळेही रसिकांचे मन जिंकतोय.


मुंबईत मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाही याबद्दल कायम एक नाराजीचा सूर असतो . अनेकदा मराठी चित्रपटाला प्राईम लोकेशन्सवर संधीही मिळत नाही, मिळाली तरी फार काळ टिकत नाही असंही चित्र अनेकदा बघायला मिळतं. मात्र ‘दशावतार’ने या सगळ्या अडथळ्यांना पार करत मराठा मंदिर, रॉक्सी, स्टर्लिंग, इरॉस, रिगल, आयनॉक्स, पॅलेडियम पीव्हीआर, कस्तुरबा, मिलाप अशा थिएटर्समध्ये सलग तीन आठवडे हाऊसफुल्ल शोज दिले आहेत. विशेष म्हणजे या थिएटर्समध्ये साधारणपणे हिंदी, इंग्रजी वा गुजराती चित्रपटांचीच भर असते. अशा ठिकाणी मराठी चित्रपटाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी सोबतच अमराठी प्रेक्षकांची गर्दी खेचली आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.


याहून अधिक आनंदाची गोष्ट म्हणजे कोकणातील यश. साधारणपणे कोकणात चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. अगदी बॉलिवूडचे मोठे चित्रपटही तिथे थिएटर्स हाऊसफुल्ल करत नाहीत. परंतु ‘दशावतार’ने हे समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, पेण, कणकवली, महाड, चिपळूण या सर्व भागातील प्रत्येक थिएटरमध्ये हा चित्रपट लागला आहे आणि प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे. पर्यावरण, निसर्ग, कोकणी माणूस आणि दशावतार कलेवर आधारलेले कथानक स्थानिक प्रेक्षकांना इतके भिडले आहे की, 'खूप काळाने आपल्या मातीची, आपल्या कलेची गोष्ट सांगणारा चित्रपट पाहायला मिळतोय', अशी भावना तेथील प्रेक्षक व्यक्त करत आहेत.


या चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसवर माया कमावली नाही तर जनमानसात एक चळवळ उभी करण्याचं कामही केलं आहे. कोकणातील जमिनी, देवराया, निसर्ग वाचवण्यासाठी कोकणी माणूस पुढाकार घेताना आज दिसत आहे. कोकणातील कातळशिल्पांबाबत, त्याच्या संवर्धनासाठी तो सजग झाला आहे. ज्या दशावतारी कलाप्रकाराचा आधार या चित्रपटात घेतला गेला, ती लोककला आणि दशावतारी कलाकार यांना पुन्हा तेजी मिळवून देण्यासाठी हा चित्रपट कारणीभूत ठरतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आलेली मरगळ झटकून मराठी चित्रपटाची ताकद दाखवून देण्यात दशावतार हा चित्रपट आज अग्रणी ठरला आहे.


झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांचे असून त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते असून यात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.


Comments
Add Comment

दिल्लीमध्ये खास भेट! नितीन गडकरींच्या हातून संकर्षणला खास पुस्तक भेट

दिल्ली : अभिनय, लेखन आणि कवितांमधून रसिकांची मनं जिंकणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर होता.

Vicky Kaushal : विकी कौशलचा मोठा खुलासा! म्हणाला...'वेळ जवळ आलीय', बाळाच्या आगमनाबाबत दिली मोठी हिंट

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक विकी कौशल (Vickey Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच आईबाबा होणार

७ वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत जेनिफर विंगेट रोमान्स करणार?

मुंबई: सोनी टीव्हीचा लोकप्रिय आणि थ्रिलिंग शो 'बेहद' आता तिसऱ्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची

महाभारतामध्ये कर्णाची भूमिका करणारे पंकज धीर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या टीव्ही मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे

'मनाचे श्लोक' नाही! आता 'तू बोल ना' म्हणायचे, दिग्दर्शक मृण्मयीने जाहीर केले नवे नाव

मुंबई: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता.

जगप्रसिद्ध 'एमटीव्ही' वाहिनी होणार बंद! नेटकरी भावुक

मुंबई: जगाला चार दशकांहून अधिक काळ संगीत ऐकवणारी 'एमटीव्ही' टीव्ही वाहिनी लवकरच बंद होणार आहे. या बाबत पॅरामाउंट