अशोकवनमध्ये नवरात्रोत्सव जल्लोषात! ३५ वर्षांचा सांस्कृतिक ठेवा, कुशल बद्रिके-तेजस्विनी लोणारी खास पाहुणे!

मुंबई : नवरात्रोत्सव म्हटलं की रास-गरबा, दांडिया, पारंपरिक गोंधळ, महिलांचे हळदीकुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम यांची रेलचेल. मुंबईच्या उपनगरातील अशोकवन कॉम्प्लेक्समध्येही यंदा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटामाटात साजरा होणार आहे.


अशोकवन सोशल अ‍ॅण्ड कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक परंपरेच्या ३५ वर्षांचा टप्पा ते पार करताय. १२०० हून अधिक सदनिका आणि ६५ रो हाऊसेस असलेली ही संपूर्ण कॉलनी १००% हिंदू कुटुंबियांनी वसलेली असून, एकात्मता आणि सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक ठरत आली आहे.


या नवरात्रोत्सवात नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये, मुलांसाठी मोफत पुस्तक वितरण, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि पैठणी स्पर्धा,पारंपरिक गोंधळ यांचा समावेश आहे.


यावर्षी उत्सवात रंगत वाढवण्यासाठी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार कुशल बद्रिके आणि तेजस्विनी लोणारी यांची खास उपस्थिती राहणार आहे. कलाकार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सामाजिक जाणीव असलेले उपक्रमही राबवण्यात येणार आहेत.


या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी दिलीप सावंत, कल्पेश लोके, मनीष प्रभू, प्रद्युम्न सावंत यांच्यासह संपूर्ण आयोजक मंडळ मेहनत घेत आहे. जास्तीत जास्त नागरिक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आयोजकांतर्फे प्रयत्न केले जात आहे.

Comments
Add Comment

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत

‘दृश्यम ३’मधील कराराचा भंग केल्याप्रकरणी ‘धुरंधर’ अक्षय खन्नाला नोटीस

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या