'अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा' - मंत्री नितेश राणे

'अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पहाणी करावी, मत्स्य व्यवसाय संस्थांनी संपर्क करावा'


मुंबई : राज्यात यंदाच्या वर्षी अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या १० दिवसात सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पहाणी करून आणि मत्स्य व्यवसाय संस्थांशी संपर्क करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.


मंत्रालयात अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस मत्स्य व्यवसाय सचिव एन. रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील सर्व मत्स्य व्यवसाय उपायुक्त दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, स्वतः अधिकाऱ्यांनी मत्स्य शेतकऱ्यांना संपर्क केल्यास त्यांचे मनोधैर्य वाढते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची भेट घ्यावी. पंचनामे करताना वस्तुनिष्ठ महिती घ्यावी. ज्या जिल्ह्यात पंचनामे करण्यासाठी अधिकारी कमी आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी न झालेल्या इतर जिल्ह्यातील अधिकारी नियुक्त करून पंचनामे लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. पंचनाम्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून त्याची प्रत मंत्रालय स्तरावर सादर करावी. मत्स्य बिजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची सविस्तर माहिती सादर करावी. माहिती सादर करत असताना बाब निहाय अकडेवारी द्यावी, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.


मंत्री राणे म्हणाले की, तलावातील गाळ काढला गेला नसल्याने मत्स्य शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे या वर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांमध्ये तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करावे. या कामासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी. अधिकाऱ्यांनी रोज किमान ८ ते १० तलावांना भेट द्यावी. दिलेल्या भेटीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयामार्फत सादर करावा असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

नीता अंबानी यांनी सुरू केले कर्करोग व डायलिसिस केंद्र

मुंबई (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी कर्करोग रुग्णांसाठी रिलायन्स

राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’

भारतातील पहिलाच प्रयोग नागपूर : वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी जंगलालगतच्या राष्ट्रीय महामार्गांवर ‘रेड टेबल

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश

मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यात त्रुटी आढळल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाई

उच्च न्यायालयाचा इशारा मुंबई : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील वायू प्रदूषण रोखण्यातील कारवाईमध्ये त्रुटी

आमदार झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांचे उत्तराधिकारी कोण?

बाळा नर यांच्या प्रभाग ७७मध्ये सर्वाधिक स्पर्धा मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुतीसाठी प्रतिष्ठेची,

भावी नगरसेवकांचे शहरासह प्रभागाच्या विकासाचे व्हिजन काय?

निवडणूक आयोग अर्जाद्वारे घेणार लिहून सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आता