भारताला अन्न नवोपक्रमाचे (Food Innovation) जागतिक केंद्र म्हणून स्थान देतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय राजधानीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या या मेगा कार्यक्रमात रशियन फेडरेशनचे उपपंतप्रधान दिमित्री पत्रीशेव यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (रस्ते वाहतूक), चिराग पासवान (अन्न प्रक्रिया उद्योग) आणि राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू सहभागी होतील.
नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ सप्टेंबर रोजी वर्ल्ड फूड इंडियाच्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ज्याचा उद्देश देशांतर्गत अन्न प्रक्रिया क्षेत्रात अधिक गुंतवणूक आकर्षित करणे आणि भारताला अन्न नवोपक्र माचे जागतिक केंद्र म्हणून स्थान देणे आहे.नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या या मेगा कार्यक्रमात रशियन फेडरेशनचे उपपंतप्रधान दिमित्री पत्रीशेव यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (रस्ते वाहतूक), चिराग पासवान (अन्न प्रक्रिया उद्योग) आणि रा ज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू सहभागी होतील.'वर्ल्ड फूड इंडिया हा केवळ एक व्यापार प्रदर्शन नाही, तर अन्न नवोन्मेष (Innovation) गुंतवणूक आणि शाश्वततेसाठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्यासाठी एक परिवर्तनकारी व्यासपीठ आहे,' असे पास वान यांनी आगामी कार्यक्रमाबद्दल माध्यमांना माहिती देताना प्रसारमाध्यमांना सांगितले. मागील आवृत्त्यांच्या यशावर आधारित, या वर्षी गुंतवणूक वचनबद्धतेत लक्षणीय वाढ होण्याची सरकारला अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
२०२३ च्या आवृत्तीत, ३३००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) करण्यात आले, तर आर्थिक वर्ष २०२४ च्या आवृत्तीत तंत्रज्ञान हस्तांतरण करारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.मंत्री पासवान यांनी भारताच्या अन्न प्रक्रिया क्षेत्रातील अप्रयुक्त क्षमतेवर प्रकाश टा कला याशिवाय असेही नमूद केले की, जगातील प्रमुख पिकांच्या पाच प्रमुख उत्पादकांमध्ये असूनही, देशाची अन्न प्रक्रिया पातळी कमी दर्जाची आहे.'मोठ्या प्रमाणात उत्पादन असूनही, आपण उच्च प्रक्रिया पातळी गाठू शकलो नाही. कापणीनंतरच्या नुकसानीब द्दल चिंता आहे, जी प्रक्रिया करून दूर केली जाऊ शकते' असे ते यावेळी म्हणाले आहेत.प्रक्रिया केलेल्या अन्नांबद्दलच्या गैरसमज दूर करण्यासाठी, मंत्रालयाने अन्न प्रक्रियेच्या विविध संकल्पनांवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न नावाची पुस्तिका विशेष प्रकाशित के ली आहे.'प्रक्रिया केलेले अन्न वजन वाढवते आणि अनेक आजारांना कारणीभूत ठरते असे गैरसमज, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि सोशल मीडियावरील कथा आहेत. या चिंता पुस्तिकेत संबोधित केल्या आहेत' असे पासवान यांनी यावेळी स्पष्ट केले.