अबुधाबी: आशिया कपमधील सुपर ४मध्ये आज पाकिस्तानचा मुकाबला श्रीलंकेशी होत आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी बोलावण्यात आले. पाकिस्तानसाठी हा सामना करो वा मरोचा आहे. हीच परिस्थिती श्रीलंकेचीही आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरले आहेत. श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना मेंडिसच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत १३३ धावा केल्या आहेत. पाकिस्तानला विजयासाठी १३४ धावांचे आव्हान आहे.
पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात अतिशय खराब झाली. सामन्याच्या दुसऱ्याच बॉलवर शाहीन आफ्रिदीने श्रीलंकेला पहिला झटका दिला. कुसल मेंडिस खाते न खोलता बाद झाला. यानंतर तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर शाहीनने निसंकाला बाद केले. सहाव्या षटकांत कुसल परेराला बाद केले. परेराने १५ धावा केल्या.
कर्णधार चरिस असलांकाने 20 धावांची खेळी केली. एका बाजूने कमिंदू मेंडिस किल्ला लढवत होता. तर दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होत होते. त्याच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेला शंभरचा आकडा पार करता आला. मेंडिसने ५० धावा केल्या. त्यानंतर जास्त काळत श्रीलंकेचे फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. त्यांना केवळ १३३ धावांपर्यंत मजल मारता आली.