मोहित सोमण:सलग दुसऱ्यांदा सोन्याच्या व चांदीच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. प्रामुख्याने युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यानंतर, एच१बी व्हिसावर वाढविलेल्या शुल्कामुळे, तसेच अतिरिक्त टॅरिफमधील अनिश्चितता यांचा एकत्रित परिणाम म्हणून सलग दुसऱ्यांदा सोने व चांदी विक्रमी दर पातळीवर पोहोचले आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२६ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११५ रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९४ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ११४३३ रूपये, २२ कॅरेटसाठी १०४८० रूपये, १८ कॅरेटसाठी ८५७५ रूपयांवर पोहोचले आहेत.माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १२६० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ११५० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ९४० रूपयांनी मोठी वाढ झाली. पर्यायाने सोन्याचे प्रति तोळा दर २४ कॅरेट ११४३३० रूपयांवर, २२ कॅरेट सोन्याचे १०४८०० रूपयांवर, १८ कॅरेट ८५७५० रूपयांवर पोहोचले आहेत.
आज भारतीय सराफा बाजारातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी ११४३३ रूपये, २२ कॅरेटसाठी १०५००, १८ कॅरेटसाठी ८७०० रूपये आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्या च्या निर्देशांकात आज संध्याकाळपर्यंत १.५९% वाढ झाल्याने दरपातळी ११४०१८ रुपयांवर पोहोचली. तर जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.११% वाढ झाली आहे. जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १.०२% वाढ होत प्रति डॉलर दरपातळी ३७८५.२७ औंसवर गेली आहे.जागतिक पातळीवर आज सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आज विशेषतः भारतीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाल्याने सोने चांदी कमोडिटीवर दबाव निर्माण झाला होता. भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर 'सेफ' गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याला प्राधान्य देत असल्याने ईटीएफसह प्रत्यक्ष सोन्यातील गुंतवणूकीत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी मागणीत वाढ होत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एमसीएक्स गोल्ड ऑक्टोबर फ्युचर्समध्ये जवळपास २ टक्क्यांनी वाढ झाली आणि तो प्रति १० ग्रॅम ११४१७९ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला, तर एमसीएक्स सिल्व्हर डिसेंबर फ्युचर्समध्ये एक टक्क्यांहून अधिक वाढ होऊन तो प्रति किलो १३५५५७ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. सणासुदीच्या काळात सोन्याची मागणीही आणखी वाढत आहे.सोन्याच्या दराबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना,'अमेरिकन फेडने २५ बेसिस पॉइंट्सचा दर कपात आणि वर्षअखेरीस आणखी सवलती मिळण्याची शक्य ता यामुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे, तर डॉलर निर्देशांक कमी झाल्याने आणि रुपया कमकुवत झाल्याने सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. मध्यवर्ती बँकेच्या सततच्या खरेदी, ईटीएफमध्ये मजबूत गुंतवणूक आणि सुरक्षित ठिकाणी खरेदीमुळे मौल्यवान धातूंच्या किमती आणखी वाढल्या आहेत' असे मेहता इक्विटीजचे कमोडिटीजचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री म्हणाले आहेत.
चांदीच्या दरातही सलग दुसऱ्यांदा विक्रमी वाढ!
आज सोन्याच्या दराप्रमाणे चांदीतही विक्रमी वाढ झाली आहे. भूराजकीय स्थितीचा फटका चांदीलाही सातत्याने बसत असून गेल्या महिनाभरापासून चांदी फ्युचर बेटिंगमध्ये मोठी वाढ झाली होती. आज 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार,चांदीच्या प्रति ग्रॅ म दरात २ रूपयांनी, प्रति किलो दरात २००० रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी चांदीचे दर प्रति ग्रॅमसाठी थेट १४० रूपयांवर, प्रति किलो दर १४०००० रुपयांवर गेले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १५००० रूपये, प्रति किलो दर १५०००० रुपयांवर पोहोचले आहेत. जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.१२% वाढ झाली आहे. तर भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.५२% वाढ झाली असून चांदीची दरपातळी १३५५७९ रूपयांवर गेली.जागतिक पातळीवर चांदीच्या दराबाबत बघितल्यास, गुंतवणूकदारां चे लक्ष आगामी फेड भाषणांवर आणि शुक्रवारी होणाऱ्या यूएस कोअर पीसीई डेटावर आहे ज्यामुळे नवीन धोरण संकेत मिळू शकतील. चलनविषय क सुलभतेच्या अपेक्षा आणि मजबूत औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या किमती चांगल्या स्थितीत राहिल्या आहेत. मूलभूत बाबींकडे पाहता, सौर, इलेक्ट्रिक वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात चांदीच्या मागणीला आधार देत आहेत.