लंडनमध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ उभारणीची मागणी

नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना निवेदन देऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लंडनमध्ये वास्तव केलेले निवासस्थान महाराष्ट्र शासनाने खरेदी करून तेथे “स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक” उभारावे, अशी मागणी केली आहे.


फरांदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लंडनमधील वास्तव्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्या वास्तूस ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. लंडनमधील भारतीय नागरिक या ठिकाणी स्मारक व्हावे, अशी सातत्याने मागणी करीत आहेत. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा वारसा जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी या वास्तूवर राष्ट्रीय स्मारक उभारणे आवश्यक आहे.”


या संदर्भात मुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी तातडीने पावले उचलून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही आमदार फरांदे यांनी केली आहे.


याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी अतिरिक्त मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र शासन यांना दिलेले आहे.

Comments
Add Comment

नागपूर-नागभीड रेल्वे मार्गाच्या ब्रॅाडगेजसाठी शासन हिश्श्याच्या ४९१ कोटी ५ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी

नागपूर : नागपूर-नागभीड दरम्यानच्या ११६.१५ किलोमीटरच्या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॅाडगेज मार्गात रुपांतर

तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता

अपघात कमी होऊन वाहतुकीस मोठा दिलासा - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पुणे : तळेगाव

इन्स्टाग्रामवर ५० व्ह्यूज द्या अन् एक ग्रॅम सोनं मोफत मिळवा

एक ग्रॅम मोफत सोन्याची जाहिरात अंगलट; साताऱ्यात वाहतूक कोंडीमुळे ज्वेलर्सवर गुन्हा दाखल सातारा: सोशल मीडियावर

Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी Cabinet Meeting पूर्वीच खुशखबर; २,२१५ कोटींच्या मदतीत कुणाला फायदा?

मुंबई : महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे शेती आणि जनजीवन गंभीर संकटात सापडले आहे. राज्यभरात ७० लाख एकरावर पिकांचे

सोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार; ९० जण मंदिरात अडकले; महसूल कर्मचाऱ्यांचाही समावेश

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून

'त्या' ग्रामपंचायतींच्या पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा, अजित पवारांचे निर्देश

पुणे : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या