प्रतिनिधी:आयसीआयसीआय बँक या देशातील आघाडीच्या खाजगी बँकेने आपल्या चेक क्लिअरन्स चौकटीत (Frameworks) मध्ये बदल केले आहेत.अनेक दिवसांपासून जलद चेक क्लिअरन्स ट्रान्स्फरची प्रलंबित मागणी ही आयसीआयसीआय बँकेने पूर्ण के ली आहे. उपलब्ध माहितीनुसार, ४ ऑक्टोबरपासून ही नवी नियमावली आयसीआयसीआय बँक लागू करणार आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कुठल्याही बँकेच्या शाखेतून चेक पाठवल्यास एक दिवसांच्या (One Working Day) आत तो क्लिअर होणार आहे.बँकेच्या माहितीनुसार, बँक हे नवे फ्रेमवर्क प्रस्थापित करणार असून अपेक्षित खात्यात तो चेक १ दिवसांच्या आत क्रेडिट होणार आहे. त्यामुळे अनेक अर्थाने चेकच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांतील गैरसोय आता टाळता येणार आहे.मुख्य तः यापूर्वी चेक क्लिअरन्स सिस्टिम (Cheque Clearance System CCS) माध्यमातून चेकची इमेज चेक करण्यात येत होती तसेच ड्रॉईची माहिती (Details) लागत होती. आता मात्र फिजिकल (भौतिक दृष्टीने) चेक ट्रान्स्फर करण्याची गरजच उरणार नाही.
ही कारवाई अथवा महत्वपूर्ण बदल रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नवीन चेक क्लिअरिंग सिस्टीमशी सुसंगत (In Line) आहेत ज्याचा उद्देश सेटलमेंट जलद करणे आहे. मागील बॅच-आधारित प्रक्रिया नवीन फ्रेमवर्कद्वारे बदलली जाईल, जी सबमिट केल्यानंतर काही ता सांत चेक क्लिअर केला जाईल.याव्यतिरिक्त बँकेने दिलेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या पॉझिटिव्ह पे वैशिष्ट्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जे उच्च-मूल्याच्या चेकना अतिरिक्त सुरक्षा (Additional Security देते.फसवणूक टाळण्यासा ठी ग्राहक ५०००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे चेक लिहिण्यापूर्वी महत्त्वाच्या तपशीलांची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पूर्व-पुष्टी (Pre Confirm) करू शकतात. ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी, पॉझिटिव्ह पे वैशिष्ट्य अनिवार्य असेल अन्यथा चेक परत केले जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे. आरबीआयची विवाद निराकरण प्रक्रिया (Dispute Settlement Process) फक्त पॉझिटिव्ह पे अंतर्गत पडताळणी केलेल्या चेकवरच लागू होणार आहे.
यापूर्वी आरबीआयने ऑगस्ट २०२५ च्या त्यांच्या निर्देशात घोषित केले होते की बॅच क्लिअरिंगमुळे सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंटला मार्ग मिळेल. पहिला टप्पा ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू होईल आणि दुसरा टप्पा ३ जानेवारी २०२६ रोजी सुरू होईल.४ ऑक्टो बरपासून सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत एकाच दैनंदिन सत्रात चेक सादरीकरणाची परवानगी असेल.'ग्राहकांना नकार टाळण्यासाठी सर्व चेक तपशील अचूक असल्याची खात्री करण्याचा सल्ला देण्यात बँकेकडून येत आहे. शब्द आणि आकड्यांमध्ये रक्कम जुळली पाहिजे, तारीख वैध असली पाहिजे आणि पैसे देणाऱ्याच्या नावावर किंवा रकमेत कोणतेही ओव्हरराइटिंग नसावे. ड्रॉवरची स्वाक्षरी देखील बँकेच्या नोंदींशी जुळली पाहिजे असे स्पष्टीकरण बँकेकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आले होते.
माहितीनुसार ,नवीन प्रणाली ४ ऑक्टोबर २२०५ पासून लागू केली जाईल. त्या दिवसापासून बँका सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रेझेंटेशन सत्र आयोजित करतील, ज्या दरम्यान सर्व चेक स्कॅन केले जातील आणि ताबडतोब क्लिअरिंग हाऊसमध्ये पाठवले जा तील. ग्राहकांना केवळ चेक नियोजित वेळेपूर्वी जमा करायचा आहे. वेळेवर जमा केलेले चेक त्याच दिवशी क्लिअर केले जातील असे बँकेने या संदर्भात म्हटले आहे.