गायक झुबीन गर्ग अनंतात विलीन


कामरूप : आसाममधील कामरूप जिल्ह्यातील कामरकुची एनसी गावात लोकप्रिय गायक झुबीन गर्गवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी लाखोंच्या संख्येने चाहत्यांनी आणि मान्यवरांनी गर्दी केली होती. सिंगापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलेल्या झुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना झालेल्या दुखापतीमुळे अपघाती मृत्यू झाला.


पाण्याखालीच झुबीनची तब्येत बिघडली. झुबीन बुडत असल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने पाण्याबाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. झुबीनचे पार्थिव सिंगापूर येथून विशेष विमानाने आसाममध्ये आणण्यात आले. झुबीनची अंत्ययात्रा अर्जुन भोगेश्वर बरुआ क्रीडा संकुलापासून सुरू झाली. क्रीडा संकुलात चाहत्यांनी अंत्यदर्शन घेतले. यानंतर अंत्ययात्रा सुरू झाली. पार्थिव रस्ते मार्गे स्मशानात नेण्यात आले. तिथे अंत्यसंस्कार झाले.


आसाम सरकार झुबीनच्या सन्मानार्थ दोन स्मारकांची निर्मिती करणार आहे. या संदर्भातील घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केली. झुबीन १९ सप्टेंबर रोजी लाईफ जॅकेट न घालता स्कुबा डायव्हिंगसाठी पाण्यात उतरला होता. हा निर्णय झुबीनसाठी प्राणघातक ठरला.


धाकट्या भावंडांनी केले अंत्यसंस्कार


झुबीनची धाकटी बहीण पमी बोरठाकूर आणि मानलेला धाकट भाऊ गायक राहुल गौतम या दोघांनी त्याच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पूर्ण केले. चितेला अग्नी देण्यात आला त्यावेळी 'जय झुबीन दा', 'झुबीन दा झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या.


Comments
Add Comment

‘त्यांच्याकडून मुलांना पिस्तुल, तर आमच्याकडून लॅपटॉप’

पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षांवर घणाघात सीतामढी : ‘हे लोक स्वतःच्या मुलांना मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि

५ रुपयांत पोटभर जेवण!

दिल्लीत १०० 'अटल कँटिन' सुरू करण्याची घोषणा नवी दिल्ली: दिल्ली सरकारने शहरात १०० ठिकाणी 'अटल कँटिन' सुरू करण्याची

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी घोषणा संसदीय

'बिहारमध्ये घुसखोर नाही, स्थानिकच सरकार बनवतील!'

विकास आणि सुरक्षेसाठी 'एनडीए'ला निवडून देण्याचे अमित शाह यांचे आवाहन पूर्णिया: "बिहारमध्ये घुसखोर सरकार बनवणार

डॉक्टर होता की कसाई, लॉकरमध्ये सापडली एके-४७ रायफल

श्रीनगर : पोलिसांनी एका डॉक्टरच्या लॉकरमधून एके-४७ रायफल जप्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरला

भाजपला नवा अध्यक्ष मिळणार, राजनाथ सिंहांनी काय सांगितले?

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर तो देशभक्ती आणि