आजपासून आदिमायेचा जागर, बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी


मुंबई : आज घटस्थापना. घट बसले. पूजा झाली. सोमवारी संध्याकाळी गरबा आणि दांडिया नाईटनं सार्वजनिक मंडळांमध्ये नवरात्रौत्सवाची औपचारिक सुरुवात होणार आहे. आदल्या दिवशी रविवारची सुटी आल्यामुळे नवरात्री निमित्त खरेदी करणाऱ्यांची ठिकठिकाणच्या बाजारांमध्ये गर्दी झाली होती. सार्वजनिक मंडळांनी रविवारी तयारीवर अखेरचा हात फिरवला. अनेक ठिकाणी पावसानं विश्रांती घेतल्यामुळे रविवारी संध्याकाळीच अनेक सार्वजनिक मंडळांनी देवीची मूर्ती वाजतगाजत मंडपांमध्ये आणली आहे.


नवरात्रीच्या काळामध्ये अनेक घरांमध्ये घटही बसतात. याच्या तयारीसाठी स्थानिक बाजारांमध्ये रविवारी घटांसह माती, नवरात्रीमध्ये पेरली जाणारी धान्ये विक्रीसाठी उपलब्ध होती. या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी उसळली होती. फुल बाजारात झेंडू १५० रुपयांपासून पुढे आणि शेवंती १०० रुपयांपासून पुढे दर्जानुसार उपलब्ध आहे.


मुंबादेवी मंदिरात पहाटे साडेपाचपासूनच दर्शनासाठी रांगा दिसत होत्या. मंदिरात सकाळी घटस्थापना झाली. मुंबईतील विविध मंडळांमध्ये आजपासून दुर्गेची आराधना सुरू झाली आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्नाने आता पुढचे १० दिवस गरबा, दांडिया, भोंडल्याच्या गाण्यांवर मुंबईकर फेर धरताना दिसतील.


सोमवारसाठी मुंबई, ठाणे, पालघर तसेच रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवार ते गुरुवार दरम्यान मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. गुरुवारी रायगड आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

ड्रोन दिसताच बोंबाबोंब करणारी शिउबाठा अखेर तोंडावर पडली

मुंबई : शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसराजवळ ड्रोन उडत असल्याचे आढळले. या

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना उभारणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू